AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W VS ENG W: इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताची सपशेल शरणागती, 4 विकेट, 112 चेंडू राखून इंग्लंड विजयी

महिला विश्वचषक 2022 च्या (Womens World Cup 2022) 15 व्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. गतविजेत्या इंग्लंडने टीम इंडियाचा (England Women vs India Women) 4 विकेट्स आणि 112 चेंडू राखून पराभव केला.

IND W VS ENG W: इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताची सपशेल शरणागती, 4 विकेट, 112 चेंडू राखून इंग्लंड विजयी
England Women's Cricket team Image Credit source: ICC
| Updated on: Mar 16, 2022 | 12:51 PM
Share

मुंबई : महिला विश्वचषक 2022 च्या (Womens World Cup 2022) 15 व्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. गतविजेत्या इंग्लंडने टीम इंडियाचा (England Women vs India Women) 4 विकेट्स आणि 112 चेंडू राखून पराभव केला. टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली. संघ अवघ्या 36.2 षटकांत 134 धावांत आटोपला. स्मृती मानधनाने सर्वाधिक 35 धावांचं योगदान दिलं. तर यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने 33 आणि झुलन गोस्वामीने 20 धावा केल्या, या व्यतिरिक्त यास्तिका भाटिया, मिताली राज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा या महत्त्वाच्या फलंदाज फ्लॉप ठरल्या. इंग्लंडकडून ऑफस्पिनर शेरलॉट डीनने (Charlotte Dean) 4 विकेट घेत अप्रतिम कामगिरी केली. फलंदाजीत इंग्लंडची कर्णधार हेदर नाइटने 52 आणि नताली सायव्हरने 45 धावा केल्या.

महिला विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडने सलग तीन पराभव स्वीकारल्यानंतर पहिला विजय मिळवला आहे. भारताला पराभूत करुन इंग्लंडने गुणतालिकेत गुणांचं खातं उघडलं आहे. त्याचबरोबर भारताचा हा गेल्या 4 सामन्यांमधला दुसरा पराभव आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धदेखील पराभवाची धूळ चाखावी लागली होती. त्याचवेळी टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. पॉईंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडचा संघ या विजयासह बांगलादेशच्या मागे सहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर टीम इंडिया चांगल्या नेट रनरेटमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या संघाने 4 सामन्यात 2 विजय मिळवले आहेत. मात्र भारताचा नेट रनरेट त्यांच्यापेक्षा चांगला आहे.

भारतीय फलंदाजांची सपशेल शरणागती

इंग्लंडची कर्णधार हेदर नाइटने नाणेफेक जिंकून भारताला माऊंट माउंगानुईच्या मैदानावर फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची सुरुवात खराब झाली, चौथ्या षटकात यास्तिका भाटिया श्रबसोलची शिकार झाली, तिला फक्त 8 धावा करता आल्या. यानंतर कर्णधार मिताली राज केवळ 5 चेंडू खेळून बाद झाली, तिच्या खात्यात एकच धाव होती. दीप्ती शर्मा शून्यावर धावबाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्याकडून चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती आणि दोघांनीही 33 धावा जोडल्या पण शार्लोट डीनने हरमनप्रीतला बाद करून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. डीनने दोन चेंडूंनंतर स्नेह राणाला शून्यावर माघारी धाडलं. अवघ्या 61 धावांत भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता.

भारताला 22 व्या षटकात सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा मानधनाला 35 च्या वैयक्तिक स्कोअरवर एक्लेस्टोनने एलबीडब्ल्यू आऊट केलं. यानंतर रिचा घोषने 33 आणि झुलनने 20 धावा करत टीम इंडियाला 100 च्या पुढे नेले. टीम इंडिया अवघ्या 134 धावांत आटोपली.

इंग्लंडची खराब सुरुवात, नाइट-सिव्हरची फटकेबाजी

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावाची दमदार सुरुवात केली. सामन्यातील दुसऱ्याच षटकात मेघना सिंगने पहिला बळी टिपला. मेघनाने सलामीवीर डेनियाल व्याटला (1) सेनेह राणाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने भारताला दुसरं यश मिळवून दिलं. झुलनने सामन्यातील तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सलामीवीर टॅमी ब्युमॉन्टला (1) पायचित पकडलं. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 3 षटकांत इंग्लंडची 2 बाद 4 अशी अशी अवस्था केली होती. इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला होता, मात्र त्यानंतर हेदर नाइट आणि नताली स्कायव्हर यांनी 65 धावा जोडून सामन्यात इंग्लंडचं कमबॅक केलं. त्यानंतर पूजा वस्त्राकरने आक्रमक नताली सायव्हरला झुलन गोस्वामीकरवी झेलबाद केलं. स्कायव्हरने 46 चेंडूत 45 धावा फटकावल्या. अवघ्या 137 धावांचे लक्ष्य असलेल्या टीम इंडियाला ही भागीदारी जड गेली. मेघना सिंगने मधल्या षटकात सोफिया डंकले आणि कॅथरीन ब्रंटला बाद केले पण हेदर नाइटच्या नाबाद अर्धशतकाने इंग्लंडला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

आयपीएलमध्ये कोणीच घेतलं नाही, हनुमा विहारीसह 7 भारतीय खेळाडूंनी धरली बांगलादेशची वाट

IPL 2022: आयपीएल खेळण्याआधी 10 षटक टाकून दाखवं, BCCI, NCA कडून हार्दिक पंड्याला चॅलेंज

IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.