AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल द्रविडचा भारतीय संघात ‘या’ पदासाठी अर्ज, द्रविडच्या निर्णयाचे पाकिस्तानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत स्वागत

भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चेला मागील काही दिवसांपासून उधाण आलं आहे.

राहुल द्रविडचा भारतीय संघात 'या' पदासाठी अर्ज, द्रविडच्या निर्णयाचे पाकिस्तानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत स्वागत
राहुल द्रविड
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 8:30 PM
Share

मुंबई : राहुल द्रविड (Rahul Dravid) हा जागतिक क्रिकेटमधील एक असा खेळाडू आहे, ज्याचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत.  त्याच्या प्रत्येक निर्णयाचं कौतुक केलं जात. आता देखील त्याच्या एका निर्णयाचे स्वागत अगदी पाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या क्रिकेटपटूंनी केले आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुलच्या नावाची चर्चा असताना राहुलने पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा (National Cricket Academy) प्रमुख या पदासाठा अर्ज केला आहे. द्रविडचा या पदावरील कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपला असून त्याने पुन्हा एकदा याच पदासाठी अर्ज केला आहे.

एकीकडे रवि शास्त्री यांचा आगामी टी-20 विश्व चषकानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपत आहे. त्यांनी यानंतर हा करार वाढवणार नसल्याची इच्छा दर्शवल्याची माहितीही समोर येत असलयाने द्रविडची या जागी वर्णी लागेल अशा चर्चेलाही चांगलच उधाण आलं आहे. द्रविड मुख्य प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार असून नुकत्याच श्रीलंका दौऱ्यावरही त्याने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं.

सलमान बट्टने केलं द्रविडच्या निर्णयाचं स्वागत

पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट त्याच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या माहितीत म्हणाला, ”द्रविडने पुन्हा एकदा NCA चा प्रमुख या पदासाठी अर्ज देऊन खूप चांगलं केलं. द्रविड यामुळे केवळ जूनियर लेवललाच भारतीय क्रिकेट सांभाळत नसून वरिष्ठ संघातही चांगले खेळाडू पुरवत आहे. ”

ब्रॅड हॉगही द्रविडच्या समर्थनात

पाकिस्तानच्या सलमान बट्टच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजीग दिग्गज क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने केलेल्या ट्विटमध्ये त्याने द्रविडच्या निर्णयाचे स्वागत करत लिहिले आहे की, ”NCA चा प्रमुखे राहिल्यास द्रविड भारतासाठी आंतरराष्ट्रीय दर्जावर चांगले योगदान देऊ शकतो. तसंच इंडियन टीमचा मुख्य प्रशिक्षक बनण्यापेक्षा NCA चा प्रमुख हे पद मला महत्त्वाचं वाटत असून द्रविडने त्याच ठिकाणी राहायला हवं.”

हे ही वाचा

T20 World Cup मध्ये भारतासाठी मोठा धोका, ‘हा’ गोलंदाज IPL मध्ये खेळून भारताविरुद्धच करणार सराव!

PHOTO : ‘सिराज तू तर जगात भारी’, पाकिस्तानची पत्रकार झाली मोहम्मद सिराजची फॅन

(India Cricketer Rahul dravid decided to Reapply for NCA post instead of indian coach)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.