T20 World Cup मध्ये भारतासाठी मोठा धोका, ‘हा’ गोलंदाज IPL मध्ये खेळून भारताविरुद्धच करणार सराव!

युएईमध्ये पार पडणाऱ्या टी 20 विश्वचषकापूर्वी जगभरातील अनेक खेळाडू हे युएईमध्येच पार पडणाऱ्या आयपीएल स्पर्धेत भाग घेतील. आयपीएलमध्ये एकत्र खेळताना हे खेळाडू एकमेंकाविरुद्ध विश्वचषकाची रणनीती देखील तयार करतील.

T20 World Cup मध्ये भारतासाठी मोठा धोका, 'हा' गोलंदाज IPL मध्ये खेळून भारताविरुद्धच करणार सराव!
आरसीबी संघ

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी-20 विश्व चषकाचे (T20 World Cup 2021) वेळापत्रक जाहीर केला आहे. 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि यूएईमध्ये पात्रता फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर 23 ऑक्टोबरपासून सुपर-12 चे सामने सुरु होतील. दरम्यान या भव्य जागतिक स्पर्धेआधी सर्वात मोठी लीग असणाऱ्या  आयपीएल 2021 (IPL 2021) चे सामने देखील युएईत पार पडणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रीका सारख्या मोठमोठ्या संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील. दरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जॅमीसन (Kyle Jamieson) हाही आयपीएलमध्ये खेळूनच त्याची विश्वचषकाची तयारी करणार असून भारतासाठी स्पर्धेत तो एक मोठा धोका आहे.

यूएईमध्ये विश्वचषकाच्या आयोजना पूर्वी उर्वरीत आयपीएल 2021 चे 31 सामने युएईतच खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये सहभागी होणारे परदेशातील खेळाडू हे त्यांच्या देशाच्या टी-20 संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. ज्यामुळे त्यांना युएईमध्ये सराव करुन तेथील परिस्थितीशी ताळमेळ साधता येणार आहे. जॅमीसनच्या मते देखील तो टी20 क्रिकेट विश्वचषकापूर्वी आयपीएल खेळून स्वत:ला चांगल्याप्रकारे तयार करुन घेऊ शकतो. ईएसपीएन-क्रिकइंफोशी बोलताना जेमिसन म्हणाला, “या परिस्थितींमध्ये युएईतील मैदानांना समजणं काहीसं अवघड आहे. त्यामुळे आयपीएल खेळून मला एक चांगली सुरुवात आणि सराव मिळेल. विश्वचषकापूर्वी एक चांगल्या प्रकारचं टी-20 क्रिकेट खेळायला मिळेल.”

RCB मध्ये राहून भारताविरुद्ध तयारी

न्यूझीलंडचा संघ भारतासोबतच सुपर-12 च्या ग्रुप-2 मध्ये आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 31 ऑक्टोबररोजी दुबईमध्ये पहिली लढत होईल. त्याआधी जॅमीसन आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघातून खेळणार आहे. यावेळी विराटला जेमिसनपासून सावध रहावे लागेल. कारण याचवेळी तो विश्वचषकासाठी भारताविरुद्ध तयारी करणार आहे.

हे ही वाचा

T20 World Cup साठी भारतीय संघात हार्दीकचं स्थान अवघड, ‘या’ तीन खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ICC T20 World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने, कोणाचं पारडं जड?

T20 World Cup Ind vs Pak : टी 20 च्या मैदानात सर्वात मोठा सामना, भारत वि पाकिस्तान मॅचचं टाईम टेबल जाहीर

(New zealand pacer kyle jamieson will practice for t20 world cup whilem playing for rcb in IPL 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI