AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dravid यांचं काय होणार? BCCI कडून परदेशी कोचचा शोध सुरु

श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजीसाठी BCCI काल टीम जाहीर केली. यावेळी आपण किती कठोर पावल उचलू शकतो ते दाखवून दिलं. कोचिंगबद्दल कधीपर्यंत होईल निर्णय?

Rahul Dravid यांचं काय होणार? BCCI कडून परदेशी कोचचा शोध सुरु
rahul-DravidImage Credit source: AFP
| Updated on: Dec 28, 2022 | 7:18 PM
Share

मुंबई: BCCI ने काल श्रीलंकेविरुद्धच्या T20 आणि ODI सीरीजसाठी टीम जाहीर केली. टी 20 सीरीजसाठी संघ जाहीर करताना, बीसीसीआयचे धाडसी निर्णय दिसून आलेत. प्रमुख खेळाडूंना टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. T20 मध्ये नवीन दृष्टीकोनातून संघ बांधणी करण्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिलीय. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टी 20 क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल करण्याचे संकेत बीसीसीआयने दिले होते. तशी सुरुवातही त्यांनी केलीय.

…तेव्हाच होईल अंतिम निर्णय

हार्दिक पंड्याची टी 20 टीमच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आलीय. आता कोचिंगमध्येही बदल करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. टी 20 मध्ये राहुल द्रविड यांचा पर्याय शोधण्यास बीसीसीआयने सुरुवात केली आहे. परदेशी प्रशिक्षकाचाही विचार होऊ शकते. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. क्रिकेट सल्लागार समिती (CAC) बरोबर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

BCCI च्या पदाधिकाऱ्याने काय सांगितलं?

“अजून काही अंतिम ठरलेलं नाही. आम्ही वेगवेगळ्या पर्यायाच शोध घेतोय. राहुल बऱ्यापैकी आमच्या योजनेचा भाग आहे. पण त्याच्यावर वर्कलोड सुद्धा आहे. आता आमचं सर्व लक्ष मायदेशात होणाऱ्या वर्ल्ड कपवर आहे. प्रत्येकासाठी संदेश स्पष्ट आहे. आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. त्यामुळे सहाजिकच सध्या टी 20 वर आमचा फोकस नाहीय. सध्या बरीच चर्चा सुरु आहे. सीएसी आणि सिलेक्टर्सनच्या चर्चेनंतरच अंतिम निर्णय होईल” असं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं. राहुल द्रविड यांच्यावर प्रश्नचिन्ह

T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्माप्रमाणे हेड कोच राहुल द्रविड यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यांच्या रणनितीवर प्रश्न निर्माण करण्यात आले. टी 20 हे युवा खेळाडूंच क्रिकेट आहे. पण टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये अनुभवी खेळाडूंना प्राधान्य दिलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.