भारत-पाकिस्तान संघ या देशात भिडणार, मोठी अपडेट आली समोर

Ind vs Pak : पुढील वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून यादरम्यान भारत आणि पाकिस्तान आमनेसामने दिसणार आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी 20 संघ पात्र ठरले आहेत. या संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. एका गटात पाच संघ असणार आहेत. या स्पर्धेचे ठिकाण अद्याप अधिकृतपणे […]

भारत-पाकिस्तान संघ या देशात भिडणार, मोठी अपडेट आली समोर
india-vs-pakistan
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 6:17 PM

Ind vs Pak : पुढील वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून यादरम्यान भारत आणि पाकिस्तान आमनेसामने दिसणार आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी 20 संघ पात्र ठरले आहेत. या संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. एका गटात पाच संघ असणार आहेत. या स्पर्धेचे ठिकाण अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नसले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अमेरिकेत होणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

अमेरिकेत स्टेज सामने

भारत आणि पाकिस्तानसह एकूण 10 संघ अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत त्यांचे सुरुवातीचे गट स्टेज सामने खेळणार आहे. या काळात प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येतील, अशी अमेरिकेला आशा आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया त्यांचे सर्व गट सामने कॅरेबियनमध्ये खेळणार हे निश्चित मानले जात आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, इंग्लंड आपले गट टप्प्यातील सामने खेळेल आणि जर संघ सुपर-8 साठी पात्र ठरला तर सुपर 8 फेरीतील सर्व सामने अँटिग्वा, बार्बाडोस आणि सेंट लुसिया येथे खेळवले जातील.

फायनल सामना कुठे होणार?

टी२० वर्ल्डकप फायनल कुठे खेळवली जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु या स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे होणार असल्याचे मानले जात आहे. याच ठिकाणी 2007 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2010 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता.

अमेरिकेत सामन्यांसाठी फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि मॅनहॅटनच्या डाउनटाउनपासून सुमारे 25 मैलांवर लॉंग आयलंडवरील आयझेनहॉवर पार्क वापरले जाणार आहेत. सुरुवातीचे दोन क्रिकेट स्टेडियम आहेत, परंतु स्पर्धेसाठी न्यूयॉर्कमध्ये तात्पुरते, 34,000 आसनक्षमतेचे स्टेडियम बांधले जाईल. न्यूयॉर्कमध्ये अंदाजे 711,000 भारतीय आणि अंदाजे 100,000 पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात.

न्यूयॉर्क आणि नवी दिल्ली यांच्या वेळेत साडेदहा तासांचा फरक असून भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेऊन भारताच्या सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचे आयोजकांनी मान्य केले आहे. इंग्लंड सध्या T20 विश्वचषकाचा चॅम्पियन आहे आणि 2022 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून विश्वचषक जिंकला होता.

Non Stop LIVE Update
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....