AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India tour of England | इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI चा प्लॅन, खेळाडूंना मुंबईत येण्याआधी 3 वेळा करावी लागणार कोरोना टेस्ट

टीम इंडिया (Team India) इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

India tour of England | इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI चा प्लॅन, खेळाडूंना मुंबईत येण्याआधी 3 वेळा करावी लागणार कोरोना टेस्ट
indian test cricket team
| Updated on: May 15, 2021 | 4:10 PM
Share

मुंबई : टीम इंडिया (Team India) लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship Final 2021) आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी India tour of England इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया अंजिक्यपदासाठी न्यूझीलंड विरुद्ध अंतिम साम्नयात दोन हात करणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया काही दिवसात रवाना होणार आहे. यासाठी सर्व खेळाडू मुंबईला एकत्र जमणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने (BCCI) या दौऱ्यासाठी एक फूलप्रूफ प्लॅन तयार केला आहे. (India Tour England 2021 Team India players will have to 3 corona test before coming to Mumbai)

काय आहे प्लॅन?

बीसीसीआयच्या या प्लॅनाबाबतची माहिती एएनआयने सूत्रांनुसार दिली आहे. त्यानुसार, सर्व खेळाडू 19 मे ला मुंबईत जमतील. मात्र त्या खेळाडूंना 3 वेळा (RT-PCR tests)आरटी-पीसीआर चाचणी करणं बंधनकारक असणार आहे. एएनआयनुसार “खेळाडूंना या तीनही कोरोना चाचण्या त्यांच्या घरी करायच्या आहेत. कोरोना रिपोर्ट नेगिटिव्ह आला तरच खेळाडूंना मुंबईच्या दिशेने येता येणार आहे. मुंबईत आल्यानंतर हे खेळाडू 14 दिवस क्वारंटाईन राहतील. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडसाठी रवाना होईल”.

दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस हा इंग्लंड दौऱ्यादरम्यान घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जाडेजा आणि हनुमा विहारीचं पुनरागमन

या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यामध्ये अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि हनुमा विहारीचं पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने एकूण 4 राखीव खेळाडूंसह 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. राखीव खेळाडूंमध्ये अभिमन्यु इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नागवासवाला या युवा खेळाडूंना संधी दिली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,

संबंधित बातम्या :

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

(India Tour England 2021 Team India players will have to 3 corona test before coming to Mumbai)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.