AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Afghanistan Toss result: भारत नाणेफेक जिंकण्यात आजही अपयशी, अफगाणिस्तानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

टी20 विश्वचषकातील पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर आज तिसरा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ अफगाणिस्तानशी दोन हात करत आहे.

India vs Afghanistan Toss result: भारत नाणेफेक जिंकण्यात आजही अपयशी, अफगाणिस्तानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
India vs Afghanistan Toss result
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 7:14 PM
Share

T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकातील भारताचा तिसरा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. भारत आणि अफगाणिस्तान या सामन्याला अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cuo 2021) नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेऊन विजय लिहित आहे. पण ही संधी भारताला मिळत नसून पुन्हा एकदा टॉस विराटने गमावला आहे. आता प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला मैदानात उतरायचे आहे.

भारताला स्पर्धेत अजूनपर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने  10 विकेट्सनी आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतीय संघाच्या पुढील फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. तरीही आशेवर दुनिया कायम आहे असं म्हणतात ना…तसंच उर्वरीत सामन्यात मोठ्या फरकाने विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. यातील पहिला सामना आज अफगाणिस्तान संघाविरुद्ध (india vs afghanistan) खेळवला जाणार आहे. स्पर्धतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला विजय अनिवार्य असून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानलाही विजय महत्त्वाचा आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी.

अफगाणिस्तान : हजरतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनउल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जदरान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नाईब, राशिद खान, करीम जनत, एस. अश्रफ, हामिद हसन, नवीन उल् हक,

हे ही वाचा :

T20 World Cup India vs Afghanistan live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना

T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा ‘नंबर-1’, टॉप 10 मध्ये एकही भारतीय नाही

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.