AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 5Th T20 Live Streaming : ऑस्ट्रेलिया अखेरच्या सामन्यात लाज राखणार? सामना कधी कुठे पाहता येणार?

India vs Australia 5Th T20I Cricket Match Live Streaming : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये पराभूत केलं. त्यानंतर उभयसंघात टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. कांगारुंचा हा अखेरचा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

IND vs AUS 5Th T20 Live Streaming : ऑस्ट्रेलिया अखेरच्या सामन्यात लाज राखणार? सामना कधी कुठे पाहता येणार?
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना झाला होता. येत्या 10 तारखेपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. 10 तारखेपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेमध्ये सूर्यकुमार यादवकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
| Updated on: Dec 02, 2023 | 8:28 PM
Share

बंगळुरु | क्रिकेट टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 डिसेंबरल रोजी चौथ्या टी 20 सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकली. टीम इंडियाने विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाचा हा भारतातील सलग पाचवा टी 20 मालिका विजय ठरला. त्यानंतर आता या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा टी 20 सामना होणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून कांगारुंना नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा पाचवा सामना कधी आणि कुठे होणार, टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार हे सर्व आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना हा रविवारी 3 डिसेंबर होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना कुठे होणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचव्या टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना हा टीव्हीवर कलर सिनेप्लेक्स या चॅनेलवर पाहता येईल. तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवरही लाईव्ह सामना पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, नॅथन एलिस आणि केन रिचर्डसन.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.