
टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकाही आपल्या नावावर केली. उभयसंघातील दुसरा सामना हा एडलेड ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नाणेफेक जिंकून फलंदाजाीसाठी भाग पाडलं. भारताने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 46.2 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने मिचले मार्श याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 25 ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत केलं. या सामन्यात भारताने विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून जिंकलं. खरं तर शेवटच्या टप्प्यात या सामन्यात रंगत वाढली होती. पण हा सामना भारताच्या हातून निसटला होता. कॉनोलीने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी टाकलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे.
ऑस्ट्रेलियाला मिचेल स्टार्कच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. त्यामुळे सामन्याची रंगत वाढली आहे. भारताला विजयासाठी दोन विकेटची गजज आहे. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 5 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर असताना ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला आहे. झेव्हियर बार्टलेट फक्त 3 धावा करून बाद झाला आहे. भारताला विजयासाठी तीन विकेटची गरज आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सहावा झटका दिला आहे. मिचेल ओवन 36 रन्स करुन आऊट झाला आहे. वॉशिंग्टन सुंदर याने अर्शदीप सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं.
ऑस्ट्रेलियाने 265 रन्सचा पाठलाग करताना 40 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 216 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 60 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. मिचेल ओवन आणि कूपर कॉनोली ही जोडी मैदानात खेळत आहेत. टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर झटपट 2 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर टाकावं लागेल.
मॅथ्यू शॉर्ट 74 धावांची खेळी करून बाद झाला आहे. त्याचा झेल 55 धावांवर असताना मोहम्मद सिराजने सोडला होता. अखेर त्याचा झेल घेण्याची संधी सिराजला मिळाली. हार्षित राणाच्या षटकात त्याने त्याचा सीमेवर झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.
मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयी अंतर कमी करण्यास सुरुवात केली आहे. तर भारताला ही जोडी फोडण्याचं आव्हान आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने मॅथ्यू शॉर्टचा सोप झेल सोडला. यामुळे ऑस्ट्रेलियावर दबाव वाढवण्याची संधी भारताने गमावली आहे. भारताला विजय हवा असेल तर विकेट मिळवणं गरजेचं आहे.
वॉशिंग्टन सुंदर याने टीम इंडियाला चौथी विकेट मिळवून दिली आहे. सुंदरने एलेक्स कॅरी याला क्लिन बोल्ड केलं आहे. कॅरीने 17 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाने 27 ओव्हरमध्ये 132 रन्स केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला आणखी 22 ओव्हरमध्ये आणखी 133 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू शॉर्ट याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाने 26 ओव्हरमध्ये 3 आऊट 130 रन्स केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 24 ओव्हरमध्ये आणखी 135 धावांची गरज आहे.
अक्षर पटेल याने टीम इंडियाच्या तिसऱ्या विकेटची प्रतिक्षा संपवली आहे. अक्षरने मॅट रेनशॉ याला क्लिन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला आहे. मॅट रेनशॉ याने 30 बॉलमध्ये 100 च्या स्ट्राईक रेटने 30 धावा केल्या.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी कॅप्टन मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड या दोघांना आऊट केलं. त्यानंतर आता मॅथ्यू शॉर्ट-मॅट रेनशॉ या जोडीने जम बसवला आहे. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे.
हर्षित राणा याने भारताला मोठी विकेट मिळवून दिली आहे. हर्षितने ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याला विराट कोहली याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. हेडने 28 धावा केल्या.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला आहे. अर्शदीपने कर्णधार मिचेल मार्श याला विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. मिचेलने 11 धावा केल्या.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चिवट सुरुवात केली आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीला बांधून ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने 5 ओव्हरमध्ये 11 धावा केल्या आहेत. ट्रेव्हिस हेड 7 आणि मिचेल मार्श 4 धावांवर खेळत आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्लेलियाकडून कॅप्टन मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 50 ओव्हरमध्ये 265 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. टीम इंडियासाठी रोहित शर्मा याने सर्वाधिक 73 धावा केल्या. श्रेयस अय्यर याने 61 तर अक्षर पटेल याने धावा केल्या. तर हर्षित राणा याने 24 तर अर्शदीप सिंह याने 13 धावांचं योगदान दिलं.
हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत टीम इंडियाला 250 पार पोहचवलं आहे. दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मोठे फटके मारले. टीम इंडियाने 48 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 255 धावा केल्या आहेत.
एडम झॅम्पा याने नितीश कुमार रेड्डी याला आऊट करत वैयक्तिक चौथी विकेट घेत टीम इंडियाला आठवा झटका दिला आहे. नितीश कुमार क्लिन बोल्ड झाला. नितीशने 8 धावा केल्या.
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल एडम झॅम्पाच्या हाती कॅच आऊट झाला आहे. मिचेल स्टार्कने बाऊंड्री लाईनवर अक्षरचा कडक असा रिले कॅच घेतला. अक्षरने 44 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहावा फलंदाजाला आऊट केलं आहे. झेव्हीयर बार्टलेट याे वॉशिंग्टन सुंदर याला जोश हेझलवूड याच्या हाती कॅच आऊट केलं. सुंदरने 14 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.
स्पिनर एडम झॅम्पा याने श्रेयस अय्यर याच्यानंतर त्याचप्रकारे केएल राहुल याला क्लिन बोल्ड करत टीम इंडियाला पाचवा झटका दिला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 5 आऊट 174 असा झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. एडम झॅम्पा याने सेट श्रेयस अय्यर याला क्लिन बोल्ड केलं आहे. श्रेयसने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रेयसचा अंदाज चुकला. बॉल बॅटला न लागता थेट स्टंपवर जाऊन आदळला. श्रेयसने 77 बॉलमध्ये 61 रन्स केल्या.
मिचेल स्टार्कने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर ही टीम इंडियाची सेट जोडी फोडत टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. स्टार्कने रोहितला जोश हेझलवूड याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने 97 बॉलमध्ये 73 रन्स केल्या.
टीम इंडियाने 17 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. शुबमन गिल आणि विराट कोहली दोघेही एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 123 बॉलमध्ये शतकी भागीदारी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने 74 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केलं.
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. रोहितने 19 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार ठोकला. यासह या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या जोडीने 19 व्या ओव्हरमध्ये 17 धावा केल्या.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झटपट 2 विकेट्स गमावल्या. शुबमन गिल याच्यानंतर विराट कोहली आऊट झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे. भारताने 50 धावांही पूर्ण केल्या आहेत.
शुबमन गिल आाणि विराट कोहली झटपट आऊट झाल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांकडून भारताला मोठ्या भागीदारीची आशा आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेिलिया विरुद्ध सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिरोवर आऊट झाला आहे. विराटला झेव्हिर बार्टलेट याने एलबीडब्ल्यू आऊट केलं. झेव्हियरने याआधी याच ओव्हरमध्ये कॅप्टन शुबमन गिल याला मिचेल मार्श याच्या हाती कॅच आऊट केलं होतं.
झेव्हियर बार्टलेट याने टीम इंडियाला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. बार्टलेटने भारतीय कर्णधार शुबमन गिल याला 9 धावांवर मिचेल मार्श याच्या हाती कॅच आऊट केलं. भारताने यासह 17 धावांवर पहिली विकेट गमावली आहे.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या टीम इंडियाच्या सलामी जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध संथ सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या 5 ओव्हरमध्ये बिनबाद 14 धावा केल्या आहेत. रोहित 8 आणि शुबमन 6 धावांवर नाबाद खेळत आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियान टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भागग पाडलं आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात बॅटिंगसाठी आली आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कूपर कॉनोली, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, मिचेल ओवेन, अॅडम झॅम्पा आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन मिचेल मार्श याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे कॅप्टन शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीवर भारताला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी या जोडीवर असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अवघ्या काही मिनिटांत टॉस होणार आहे. शुबमनला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात टॉस गमवावा लागला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात तरी शुबमनच्या बाजूने कौल लागणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, अॅडम झॅम्पा, बेन द्वारशुइस, मार्नस लाबुशेन आणि झेवियर बार्टलेट.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (डब्ल्यू), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसीद कृष्णा, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल.
शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. भारताला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात डीएलएसनुसार 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. आता टीम इंडिया एडलेड ओव्हलमध्ये पहिल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज झाली आहे.