AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 1st T20, Match Preview: टीम इंडियात इंग्लंडला टी 20 सीरीज मध्ये हरवण्याची क्षमता आहे का?

भारतीय संघ व्यवस्थापनाने टीम इंडियात (Team India) आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या युवा खेळाडूंना संधी दिली. पण आजपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या टी 20 मालिकेत भारत आपला मजबूत संघ मैदानात उतरवेल.

IND vs ENG, 1st T20, Match Preview: टीम इंडियात इंग्लंडला टी 20 सीरीज मध्ये हरवण्याची क्षमता आहे का?
Team india
| Updated on: Jul 07, 2022 | 9:37 AM
Share

मुंबई: भारतीय संघ व्यवस्थापनाने टीम इंडियात (Team India) आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या युवा खेळाडूंना संधी दिली. पण आजपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या टी 20 मालिकेत भारत आपला मजबूत संघ मैदानात उतरवेल. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) लक्षात घेऊन भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी खेळणार आहे. कोविड 19 (Covid-19) ची लागण झाल्याने बर्मिंघम कसोटीत रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. पण आज तो इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात खेळेल, अशी अपेक्षा आहे. विराट कोहली, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दुसऱ्या सामन्यापासून इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत सहभागी होतील. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या खेळाडूंना पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.

दीपक हुड्ड-इशान किशनसाठी संधी

दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला आयर्लंड सीरीजच्या दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. रोहित आजच्या सामन्यात खेळला, तर ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार नाही. इशान किशनने मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. त्याने प्रभावित केलं आहे. इंग्लंड सारख्या मजबूत संघाविरुद्ध चांगल्या इनिंग खेळून रिझर्व फलंदाज म्हणून स्थान भक्कम करण्याची इशानकडे संधी आहे. दुसऱ्यासामन्यात विराट कोहली तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला येईल. दीपक हुड्डाला पहिल्या सामन्यात संधी मिळाल्यास पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात नाबाद 47 आणि दुसऱ्यासामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.

सूर्यकुमार यादवला कामगिरी उंचावावी लागेल

दुखापतीमधून सावरलेल्या सूर्यकुमार यादवला आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मागच्या आठवड्यात डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने चांगली कामगिरी केली होती. ऋषभ पंतच्या अनुपस्थित दिनेश कार्तिककडे विकेटकीपिंगची जबाबदारी असेल. अक्षर पटेलचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश होऊ शकतो. हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान या तिघांना संधी मिळू शकते. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या दोघांपैकी टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देईल का? हा प्रश्न आहे.

वर्ल्ड कप आधी भारतीय संघ किती सामने खेळणार?

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी भारतीय संघ 15 टी 20 सामने खेळणार आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध तीन त्यानंतर 29 जुलैपासून 7 ऑगस्टपर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध पाच आणि त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आशिया कप मध्ये पाच सामने खेळायचे आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर वर्ल्ड कपसाठी नेमका संघ कसा असेल? त्याची प्रक्रिया सुरु होईल.

इंग्लंडचा संघ –

जोस बटलर (कॅप्टन), मोइन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रीस टॉपली आणि डेविड विली

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कॅप्टन,), इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार,

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.