India vs England 4th Test | व्वा पंत ! सिक्सर खेचत रिषभ पंतचे खणखणीत शतक पूर्ण

रिषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं शतक (rishbh pant scored hundred) ठरलं.

India vs England 4th Test | व्वा पंत ! सिक्सर खेचत रिषभ पंतचे खणखणीत शतक पूर्ण
रिषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं शतक (rishbh pant scored hundred) ठरलं.
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 6:57 PM

अहमदाबाद : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने शानदार शतक (Rishabh Pant) पूर्ण केलं आहे. रिषभने 115 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह शतक पूर्ण केलं आहे. रिषभच्या कसोटी कारकिर्दीतील हे 3 रं शतक ठरलं. रिषभने इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या बोलिंगवर सिक्स खेचत शतक पूर्ण केलं.  रिषभने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पाहुण्या इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप चोप चोपला. पंतने इंग्लंडच्या बोलर्सचा गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पंतने एका मागोमाग एक चौकार खेचले. यासह पंतनं आपलं शतक पूर्ण केलं. (india vs england 4th test day 2 rishbh pant scored hundred)

सातव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी

रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने सातव्या विकेटसाठी निर्णायक शतकी भागीदारी केली. या दोघांनी विकेटसाठी 158 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. यी भागीदारीदरम्यान रिषभने कसोटी कारकिर्दीतील तिसरं शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे पंतने सिक्स खेचत हे शतक झळकावलं. त्यानंतर रिषभ पंत 101 धावांवर आऊट झाला. पंतने एकूण 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावांची खेळी केली.

पंतने मारलेला रिव्हर्स स्वीप

अँडरसन सामन्यातील 83 वी ओव्हर टाकयला आला. पंत आणि वॉशिग्टंन सुंदरमध्ये सातव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली होती. तर पंत स्वत: 89 धावांवर खेळत होता. अँडरसनने या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर पंतने परफेक्ट टायमिंगसह फर्स्ट स्लीपच्या डोक्यावरुन अचूक रिव्हर्स स्वीप लगावला. पंतने लगावलेला फटका पाहून अँडरसनही अवाक झाला. पंतने मारलेल्या या फटक्यानंतर इंग्लंड टीमचा विशेषत: अँडरसनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पंतने मारलेला या फटक्याने अनेक आजी माजी खेळाडूही प्रभावित झाले. या रिव्हर्स स्वीपसाठी पंतचं दिग्गज खेळाडूंकडून कौतुक केलं जातंय.

संबंधित बातम्या : 

India vs England 4th Test | पुजारा, विराटसह रहाणेही अपयशी, टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरकडून निराशा, रोहितची एकाकी झुंज

India vs England 4Th Test | कर्णधार विराटकडून पुन्हा एकदा निराशा, ‘रनमशीन’ कोहलीची धोनीच्या ‘या’ नकोशा विक्रमाशी बरोबरी

(india vs england 4th test day 2 rishbh pant scored hundred)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.