AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 4th Test | पुजारा, विराटसह रहाणेही अपयशी, टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरकडून निराशा, रोहितची एकाकी झुंज

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत (india vs england 4th test) टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी ( india top order flop) निराशाजनक कामगिरी केली.

India vs England 4th Test | पुजारा, विराटसह रहाणेही अपयशी, टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरकडून निराशा,  रोहितची एकाकी झुंज
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत (india vs england 4th test) टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी (india top order flop) निराशाजनक कामगिरी केली.
| Updated on: Mar 05, 2021 | 2:56 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना (India vs England 4th Test) खेळला जात आहे. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फंलदाजांनी पहिल्या डावात निराशा केली. शुबमन गिल आणि विराट कोहलीने (Virat Kohli) सपशेल निराशा केली. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) योग्य सुरुवात मिळाली. पण त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपातंर करता आले नाही. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. (india vs england 4th test 2nd day team india top order flop)

शुबमन गिल गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरतोय. त्याला मोठी खेळी साकारण्यात अपयश येत आहे. भारताने पहिल्या दिवसखेर 24 धावा करुन 1 विकेट गमावली. या धावसंख्येपासून रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. सुरुवातीचे काही ओव्हर्स चांगल्या प्रकारे खेळल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर जॅक लीचने इंग्लंडच्या वाटेतील मोठा काटा काढला. सेट झालेल्या पुजाराला लीचने 17 धावांवर आऊट केलं. पुजाराने 66 चेंडूत 1 फोरसह 17 धावा काढल्या.

कर्णधार विराट शून्यावर बाद

पुजारानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आला. विराटकडून सर्वांनाच मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण विराटला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटने पहिले 7 चेंडू डॉट केले. त्यानंतर तो आठव्या चेंडूवर शून्यावर आऊट झाला. बेन स्टोक्सने विराटला आऊट केलं. स्टोक्सने विराटला आऊट करण्याची ही 5वी वेळ ठरली. तसेच विराट कसोटीमध्ये कर्णधार म्हणून आठव्यांदा आऊट झाला. यासह त्याने धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली.

अजिंक्य चांगल्या सुरुवातीनंतर अपयशी

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने झोकात सुरुवात केली. पण त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. रहाणेने 45 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावा केल्या.

रोहितची एकाकी झुंज

एका बाजूला ठराविक अंतराने विकेट जात होते. पण सलामीवीर रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. रोहितने एकाकी झुंज दिली. रोहितचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले. रोहित 49 धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सने रोहितला एलबीडबल्यू आऊट केलं. रोहितने 144 चेंडूत 7 चौकारांसह 49 धावांची खेळी केली.

पहिलं सत्र इंग्लंडच्या नावे

दुसऱ्या दिवसातील पहिलं सत्र इंग्लंडच्या नावे राहिलं. पहिल्या सत्रात एकूण 25. 5 ओव्हर्सचा खेळ पार पडला. हे सत्र इंग्लंडच्या नावावर राहिलं. या सत्रात इंग्लंडने 56 धावा देत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या 3 अनुभवी फलंदाजांना बाद केलं.

संबंधित बातम्या :

India vs England 4Th Test | कर्णधार विराटकडून पुन्हा एकदा निराशा, ‘रनमशीन’ कोहलीची धोनीच्या ‘या’ नकोशा विक्रमाशी बरोबरी

India vs Engalnd 4th Test | कॅप्टन विराट कोहलीला ‘या’ दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी

(india vs england 4th test 2nd day team india top order flop)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.