VIDEO : भर मैदानात विराट कोहली भडकला, शार्दूल ठाकूरला नको ते बोलला

इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs England 3Rd T20I) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. India Vs England t20 match

VIDEO : भर मैदानात विराट कोहली भडकला, शार्दूल ठाकूरला नको ते बोलला
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 5:14 PM

अहमदाबाद : इंग्लंडने टीम इंडियावर 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात (India vs England 3Rd T20I) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. जोस बटलरच्या (Jos buttler) भन्नाट खेळीपुढे भारताचा निभाव लागला नाही. भारताने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जोस बटलरने (Jos Buttler) 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघ इंग्लंडच्या तुलने खूप मागे पडल्याचे पाहायाल मिळाले. दरम्यान, या सामना हातून निसटत असताना कर्णधार विराट कोहली अनेकदा संतापल्याचे पाहायला मिळाले. (India vs England : Virat Kohli loses control over Shardul Thakur’s poor fielding)

अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) पारा चढलेला पाहायला मिळाला. 12 वं षटक सुरु असताना जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूरकडून (Shardul Thakur) क्षेत्ररक्षणात चूक झाली आणि इंग्लंडला ओव्हरथ्रोमुळे एक धाव अधिक मिळाली. त्यामुळे संतापलेला विराट कोहलीने रागाच्या भरात शार्दुलला उद्देशून अपशब्दांचा उच्चार केला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे!

1. टॉप ऑर्डर्सकडून पुन्हा निराशा

भारताच्या टॉप ऑर्डर्सने पुन्हा एकदा निराशा केली. के.एल. राहुल, इशान, किशान आणि रोहित शर्मा यांना चमकदार खेळी करता आली नाही. के.एल. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. किशान 4 तर रोहित 15 रन्सवर आऊट झाला. याचमुळे भारतीय संघाला मॅचमध्ये पुनरागमन करता आला नाही. पहिल्या टी 20 मध्ये देखील भारतीय टॉप ऑर्डर्स बॅट्समनने सपशेल निराशा केली होती.

2. खराब फिल्डिंग

पहिल्यांचा बॅटिंग केल्यानंतर आणि कमी स्कोअर झाल्यानंतर फिल्डिंग करताना पूर्ण ताकदीने फिल्डिंग करावी लागते. मात्र भारतीय संघाकडून फिल्डिंगमध्ये काही चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. भारतीय संघाच्या खेळाडूंनी इंग्लंड संघाच्या विकेट्स मिळवण्याच्या अनेक संधी गमावल्या. विराट कोहली आणि युजवेंद्र चहलने कॅचेस सोडल्या तर शार्दुल ठाकूरने म्हणावी अशी फिल्डिंग केली नाही. इशान किशननेही क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवली नाही. साहजिक किशन आणि शार्दुलच्या हातात चेंडू गेल्यानंतर रन्स मिळवणं इंग्लंड संघाला सोपं गेलं.

3. पॉवरप्लेमध्ये शांत खेळ

पहिल्या पॉवप्लेधमध्ये फलंदाजांनी आक्रमक खेळ करुन प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणायचं असतं. मात्र पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारतीय फलंदाज 24 धावाच करु शकले. टॉप ऑडर्सच्या निराशाजनक खेळीनंतर अंतिमत: भारतीय संघाने 157 धावा केल्या. इथेच भारतीय संघ बॅकफूटला गेला. जास्त रन्स न झाल्याने इंग्लंड संघाला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं.

4. पॉवरप्लेमध्ये भारताला विकेट्स मिळाल्या नाहीत

भारत फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स मिळाल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या बॅटिंग दरम्यानच्या पॉवरप्लेमध्ये भारताला केवळ एकच विकेट्स मिळवता आली. या टी ट्वेन्टी मालिकेत भारताच्या बाबतीत असं दुसऱ्यांदा घडतंय की पॉवरप्लेमध्ये विकेट्स मिळवण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश येतंय.

5. जोस बटलरला रोखण्यात अपयश

इंग्लंडच्या जोस बटलरने तिसऱ्या टी ट्वेन्टीत धमाकेदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. जॉस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं नाही.

हे ही वाचा :

India vs England 3Rd T20I | कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह शानदार कामगिरी

India vs England 2021, 3rd T20 | जोस बटलरची शानदार खेळी, इंग्लंडची टीम इंडियावर 8 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

(India vs England : Virat Kohli loses control over Shardul Thakur’s poor fielding)

Non Stop LIVE Update
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.