India vs England 2021, 3rd T20 | जोस बटलरची शानदार खेळी, इंग्लंडची टीम इंडियावर 8 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

जॉस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जोस बटलरने 52 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या. (india vs england 3rd t20 live score)

India vs England 2021, 3rd T20 | जोस बटलरची शानदार खेळी, इंग्लंडची टीम इंडियावर 8 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी
जॉस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जोस बटलरने 52 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या.

अहमदाबाद : इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. जोस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जोस बटलरने 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टोने 40 धावांची नाबाद खेळी करत बटलरला चांगली साथ दिली. दरम्यान या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. (india vs england 3rd t20 live score updates in marathi narendra modi stadium ahmedabad ind vs eng 2021 t20i cricket match news online) लाईव्ह स्कोअरकार्ड

Match Highlights

 • इंग्लंडची मालिकेत आघाडी

  इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान या मालिकेतील चौथा सामना 18 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

 • जॉस बटलरची विजयी खेळी

  जॉस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जोस बटलरने 52 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 16 Mar 2021 22:57 PM (IST)

  जॉस बटलर मॅन ऑफ द मॅच

  83 धावांची अफलातून नाबाद खेळी करणाऱ्या जॉस बटलरला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

 • 16 Mar 2021 22:41 PM (IST)

  इंग्लंडचा 8 विकेट्सने विजय

  इंग्लंडने तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियावर 8  विकेट्सने विजय मिळवला आहे.  भारताने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंडकडून   जोस बटलरने 52 चेंडूत नाबाद 83 धावांची खेळी केली. तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 40 धावा केल्या.

 • 16 Mar 2021 22:24 PM (IST)

  कोहलीकडून बटलरला जीवनदान

  विराट कोहलीने बटलरला जीवनदान दिलं आहे. बटलरने चहलच्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारला. हा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेला. हा कॅच थोडा अवघड होता. विराटने हवेत झेपावत कॅच घेण्याचा प्रयत्न केला. पण यात विराट अपयशी ठरला.

 • 16 Mar 2021 21:51 PM (IST)

  इंग्लंडला दुसरा धक्का

  img

  इंग्लंडलने दुसरी विकेट गमावली आहे. वॉशिंग्टन सुंदरने डेव्हीड मलानला कीपर रिषभ पंतच्या हाती स्टपिंग केलं आहे.

 • 16 Mar 2021 21:47 PM (IST)

  जोस बटलरचे अर्धशतक

  जोस बटलरने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. बटलरच्या या खेळीमुळे इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

 • 16 Mar 2021 21:32 PM (IST)

  इंग्लंडच्या पावरप्लेमध्ये 57 धावा

  इंग्लंडच्या पावर प्लेच्या पहिल्या 6 षटकांमध्ये  1 विकेट गमावून  57 धावा केल्या आहेत. जोस बटलरने या पावर प्लेचा पुरेपुर फायदा घेतला. त्याने पावरप्लेमध्ये 17 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा केल्या.

 • 16 Mar 2021 21:20 PM (IST)

  इंग्लंडला पहिला धक्का

  img

  इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने  जेसन रॉयला रोहित शर्माच्या हाती  कॅच आऊट केलं आहे.  रॉयने 9 धावा केल्या.

 • 16 Mar 2021 21:00 PM (IST)

  इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 157 धावांचे आव्हान

  इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे.

 • 16 Mar 2021 20:48 PM (IST)

  इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान

  टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पांड्याने 17 धावा करत विराटला चांगली साथ दिली. तर रिषभ पंतने 25 धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

 • 16 Mar 2021 20:36 PM (IST)

  विराट-हार्दिकमध्ये सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

  विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. अवघ्या 25 चेंडूच्या साहय्याने ही भागीदारी केली आहे. यादरम्यान विराटने जोरदार फटकेबाजी केली. तर हार्दिकनेही विराटला चांगली साथ दिली.

 • 16 Mar 2021 20:31 PM (IST)

  विराटचे सलग 2 सिक्सर

  img

  विराटने सामन्यातील 18 व्या ओव्हरमधील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग 2 षटकार खेचले.

 • 16 Mar 2021 20:29 PM (IST)

  कॅप्टन विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक

  कॅप्टन विराट कोहलीने झुंजार अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. विराटने एकाबाजूला विकेट जात असताना एक बाजू लावून धरली. त्याने टीम इंडियाचा डाव सावरला. 
   
   
 • 16 Mar 2021 20:12 PM (IST)

  टीम इंडियाला पाचवा झटका

  img

  टीम इंडियाला पाचवा झटका बसला आहे.  श्रेयस अय्यर कॅच आऊट झाला आहे. अय्यरने 9 धावा केल्या. 
   
 • 16 Mar 2021 19:56 PM (IST)

  टीम इंडियाला चौथा धक्का

  img

  टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. रिषभ पंत चोरटी धाव घेण्याच्या नादात रन आऊट झाला आहे. पंतने 25 धावा केल्या.

 • 16 Mar 2021 19:48 PM (IST)

  10 ओव्हरनंतर टीम इंडियाच्या 55 धावा

  टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 55 धावा केल्या आहेत.

 • 16 Mar 2021 19:47 PM (IST)

  रिषभ पंतचे सलग 2 चौकार

  img

  रिषभ पंतने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर सलग 2 चौकार लगावले आहेत. रशीद सामन्यातील 10 व्या ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर पंतने 2 चौकार फटकावले.

 • 16 Mar 2021 19:36 PM (IST)

  पावरप्लेमध्ये 3 विकेट्स गमावून 24 धावा

  टीम इंडियाची खराब सुरुवात झाली आहे. विराटसेनेने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 24 धावा केल्या आहेत.

 • 16 Mar 2021 19:30 PM (IST)

  टीम इंडियाला तिसरा धक्का

  img

  टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे. इशान किशन आऊट झाला आहे. इशानने 4 धावा केल्या.

 • 16 Mar 2021 19:25 PM (IST)

  रोहित शर्मा आऊट

  img

  टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. रोहित शर्मा 15 धावा करुन माघारी परतला आहे. रोहितनंतर कॅप्टन विराट कोहली मैदानात आला आहे.

 • 16 Mar 2021 19:18 PM (IST)

  पहिला चौका रोहितच्या बॅटने

  img

  सामन्यातील पहिला चौकार हिटमॅन रोहित शर्माने फटकावला आहे.

 • 16 Mar 2021 19:14 PM (IST)

  टीम इंडियाला पहिला धक्का

  img

  टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर केएल राहुल शून्यावर बाद झाला आहे. केएलनंतर इशान किशन मैदानात आला आहे.

 • 16 Mar 2021 19:02 PM (IST)

  टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात

  टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

 • 16 Mar 2021 18:57 PM (IST)

  इयॉन मॉर्गनचा 100 वा टी 20 सामना

  इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनचा त्याच्या टी 20 कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. इयॉन मॉर्गन अशी कामगिरी करणारा पहिला इंग्रज तर चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी शोएब मलिक, रोहित शर्मा आणि रॉस टेलरने ही कामगिरी केली आहे.

 • 16 Mar 2021 18:53 PM (IST)

  असे आहेत दोन्ही संघ

  तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी दोन्ही संघात प्रत्येकी 1 बदल करण्यात आला आहे.

 • 16 Mar 2021 18:45 PM (IST)

  इंग्लंडची टीम

  इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.

 • 16 Mar 2021 18:41 PM (IST)

  तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया

  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल.

 • 16 Mar 2021 18:38 PM (IST)

  रोहित शर्माचं पुनरागमन, सूर्यकुमारला डच्चू

  तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 1 बदल करण्यात आला आहे. संघात सूर्यकुमार यादवच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. यासह रोहितचं संघात  पुनरागमन झालं आहे.

 • 16 Mar 2021 18:35 PM (IST)

  इंग्लंडने टॉस जिंकला

  इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.

 • 16 Mar 2021 18:14 PM (IST)

  क्रिकेट चाहत्यांविना पार पडणार सामना

  तिसरा आणि आणि उर्वरित आणि टी 20 सामने हे प्रेक्षकांविना बंद दाराआड खेळवण्यात येणार  आहेत. कोरोनाच्या वाढच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला. त्यामुळे आता टी 20 मालिकेतील सर्व सामने हे बंद दाराआड खेळवण्यात येणार आहेत.

 • 16 Mar 2021 18:10 PM (IST)

  नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने?

  6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूनं लागणार हे टॉसनंतर समजेल.

 • 16 Mar 2021 18:00 PM (IST)

  टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20 सामना

  टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (16 मार्च) तिसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाल आहे.

Published On - 10:57 pm, Tue, 16 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI