AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत विरुद्ध जपान पहिल्या वहिल्या सामन्यातच मोठा ड्रामा, टीम इंडियाच्या तिघांचा पारा चढला, अंपायरनेही थेट निर्णय…

India Japan Historic Cricket Match : भारत आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक सामना शेवटच्या षटकात चांगलाच नाट्यमय ठरला. जपानला विजयासाठी 4 चेंडूंत 6 धावांची गरज असताना अक्षर पटेलच्या षटकातील एका चेंडूवर अंपायरच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा आक्षेप पाहायला मिळाला. नेमंक काय घडलं होतं?

भारत विरुद्ध जपान पहिल्या वहिल्या सामन्यातच मोठा ड्रामा, टीम इंडियाच्या तिघांचा पारा चढला, अंपायरनेही थेट निर्णय...
India Japan Historic Cricket Match Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 22, 2026 | 3:47 PM
Share

भारत आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक क्रिकेट सामना अत्यंत रोमांचक वळणावर संपला. खेळपट्टीची स्थिती आणि खेळाडूंची कामगिरी या सगळ्यामुळे हा सामना रंगतदार ठरला. पण यात सर्वात मोठी नाट्यमय घडामोड जपानच्या डावातील शेवटच्या षटकात पाहायला मिळाली. भारत आणि जपानच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सामना खेळवला जात होता. या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला. पण हा विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना मैदानावर जीव ओतण्यापासून ते चक्क पंचांशी भिडण्यापर्यंत सर्व काही करावे लागले.

भारतीय खेळाडू आणि विशेषतः कर्णधार श्रेयस अय्यर याचा पंचांसोबतचा हा वाद जपानच्या डावातील शेवटच्या षटकात पाहायला मिळाला. हे महत्त्वाचे षटक भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल टाकत होता. या षटकातील तिसरा चेंडू पंचांनी वाईड दिला. पहिल्यांदा असे झाले तेव्हा फार काही वाद झाला नाही. पण जेव्हा अक्षरने पुन्हा तो तिसरा चेंडू टाकला आणि पंचांनी सलग दुसऱ्यांदा त्याला वाईड घोषित केले, तेव्हा मात्र अक्षर पटेल आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन चांगलेच संतापलेले दिसले. अक्षरने लगेच आपली तीव्र नाराजी व्यक्त करत पंच ख्रिस थर्गेट यांच्याशी वाद घातला.

आपल्या खेळाडूंना नाराज पाहून कर्णधार श्रेयस अय्यरही शांत बसला नाही. तो थेट स्क्वेअर लेगला उभे असलेले पंच ख्रिस ब्राऊन यांच्याकडे गेला. श्रेयसने आक्रमकपणे बाजू मांडल्यानंतर ख्रिस ब्राऊन यांनी इतर पंचांशी चर्चा केली. सुरुवातीला मैदानावरील पंच आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसले, पण थोड्याच वेळात अचानक त्यांनी आपला निर्णय फिरवला. जो चेंडू वाईड दिला होता, तो नंतर वैध ठरवण्यात आला.

जेव्हा ही सगळी घटना घडली, तेव्हा जपानला विजयासाठी 4 चेंडूंत 6 धावांची गरज होती. जर पंचांनी निर्णय बदलला नसता, तर जपानच्या खात्यात 1 धाव जोडली गेली असती आणि हेच समीकरण 4 चेंडूंत 5 धावा असे झाले असते. यामुळे जपानचे काम सोपे झाले असते. पण भारतीय खेळाडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि पंचांनी निर्णय बदलल्यामुळे सामन्याला वेगळेच वळण लागले. परिणामी 5 षटकांत 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा जपानचा संघ फक्त 30 धावाच करू शकला आणि भारताने हा सामना खिशात घातला.

Follow Us
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष