IND vs NZ 1st ODI Report: 306 धावा करुनही टीम इंडिया पहिल्या वनडेमध्ये हरली

IND vs NZ 1st ODI Report: न्यूझीलंडच्या 'या' दोन बॅट्समनसमोर टीम इंडियाचे सर्वच गोलंदाज हतबल ठरले.

IND vs NZ 1st ODI Report: 306 धावा करुनही टीम इंडिया पहिल्या वनडेमध्ये हरली
IND vs NZ Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 3:25 PM

ऑकलंड: T20 सीरीज जिंकणाऱ्या टीम इंडियाची वनडे मालिकेत पराभवाने सुरुवात झाली आहे. आज ऑकलंडच्या ईडन पार्कवर टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना खेळला गेला. या मॅचमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली. त्यांनी 7 विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. 50 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 7 विकेट गमावून 306 धावा केल्या. यजमान टीमने 47.1 ओव्हर्समध्ये तीन विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं.

भारताकडून कोण चांगलं खेळलं?

लॅथमने नाबाद 145 धावा फटकावल्या. कॅप्टन केन विलयम्सनने नाबाद 94 धावा केल्या. न्यूझीलंड तीन मॅचच्या वनडे सीरीजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने शानदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. कॅप्टन शिखर धवनने 72 धावा फटकावल्या. दुसरा सलामीवीर शुभमन गिलने 50 धावा केल्या.

काय चूक झाली?

भारताकडून एक-दोन फलंदाजांनी वेगवान खेळी केली असती, तर हा स्कोर जास्त झाला असता. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन आणि टिम साऊदीने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.

न्यूझीलंडची धीमी सुरुवात, पण….

307 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडने धीमी सुरुवात केली. पहिली विकेट त्यांचा लवकर गेला. शार्दुल ठाकूरने आठव्या ओव्हरमध्ये सलामीवीर फिन एलनला ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या 35 होती. फिनने 22 धावा केल्या. त्यानंतर वनडे डेब्यु करणाऱ्या उमरान मलिकने डेवॉन कॉनवेला आऊट केलं. कॉनवेने 24 धावा केल्या. न्यूझीलंडच्या 88 धावा असताना डॅरेल मिचेलच्या रुपाने तिसरी विकेट गेली. उमरानने ही विकेट काढली.

विलयम्सन-लॅथमच्या पार्टनरशिपने विजय हिरावला

विलयम्सन आणि लॅथमने शानदार भागीदारी करुन भारताच्या हातून विजय हिसकावला. लॅथमने 104 चेंडूत नाबाद 145 धावा फटकावल्या. त्याने 19 चौकार आणि 5 षटकार लगावले. विलयम्सनने 98 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होता. विलयम्सन आणि लॅथमने चौथ्या विकेटसाठी नाबाद 221 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.