IND vs NZ : मुंबई कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, 3 दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले आहेत. संघाचे तीन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत.

IND vs NZ : मुंबई कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, 3 दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त
Indian Cricket Team (Test)
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 11:31 AM

मुंबई : येथील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले आहेत. संघाचे तीन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने सांगितले की, इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याचवेळी जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या डाव्या पायांचे स्नायू दुखावले आहेत. (India vs New Zealand : Ajinkya Rahane, Ravindra Jadeja, Ishant Sharma ruled out Mumbai Test due to injuries)

इशांत बाहेर पडल्याने मोहम्मद सिराजचा संघात प्रवेश निश्चित समजला जात आहे. त्याचबरोबर टीम इंडियाची आणखी एक समस्याही दूर झाली आहे. कोहलीच्या पुनरागमनानंतर संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत बराच संभ्रम निर्माण झाला होता. विराटसाठी प्लेईंग-11 मधून कोणाला वगळावे, असा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सतावत होता. कारण पहिल्या सामन्यात कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून इतिहास रचला. रहाणे दुखापतीमुळे बाहेर पडल्याने ही अडचण संपली आहे. रवींद्र जडेजाच्या जागी संघ कोणाला संधी देतो हे पाहावे लागेल.

तीन जलदगती गोलंदाजांसह संघ मैदानात उतरणार!

मुंबईत कालपासून पाऊस सुरू असून या पावसामुळे नाणेफेकीला उशीर होत आहे. मुंबईतलं हवामान पाहता संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. उमेश यादव संघात कायम राहणार आहे. इशांतच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकेल. तसेच संघाने तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, तर प्रसिद्ध कृष्णाचे नाव प्लेईंग-11 मध्ये दिसू शकते आणि यासह तो कसोटी पदार्पण करू शकतो. प्रसिद्ध कृष्णा टीम इंडियासाठी आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळला आहे पण त्याला कसोटी सामन्यात संधी मिळालेली नाही.

जयंत यादव कमबॅक करणार का?

कानपूरप्रमाणेच मुंबईतही संघाने तीन फिरकीपटूंसोबत उतरण्याचा निर्णय घेतल्यास, जडेजाच्या जागी अष्टपैलू जयंत यादव प्लेईंग-11 मध्ये दिसू शकतो. जयंतने भारतासाठी चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने एक शतक आणि अर्धशतकासह 228 धावा करत 11 बळीदेखील घेतले आहेत. फेब्रुवारी 2017 मध्ये त्याने पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

इतर बातम्या

IND vs NZ live Streaming of 2nd Test Match: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IND vs NZ : पहिली टेस्ट ड्रॉ, मुंबई कसोटीवर पावसाचं सावट, टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगणार?

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

(India vs New Zealand : Ajinkya Rahane, Ravindra Jadeja, Ishant Sharma ruled out Mumbai Test due to injuries)

Non Stop LIVE Update
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.