AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, फिरकीपटूसाठी तब्बल 4 वर्षानंतर खोलली संघाची दारं

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा नुकतीच केली आहे. यावेळी काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली असताना एका खेळाडूला तब्बल 4 वर्षानंतर संधी मिळाली आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, फिरकीपटूसाठी तब्बल 4 वर्षानंतर खोलली संघाची दारं
जयंत यादव
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 5:47 PM
Share

मुंबई: न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताने (India vs New Zealand) कसोटी संघ जाहीर केला असून यावेळी काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पण यामधील एक खेळाडूचं संघात परतणं तसं थोड आश्चर्यकारकचं आहे. हा खेळाडू म्हणजे फिरकीपटू जयंत यादव (Jayant Yadav).  तब्बल 4 वर्षानंतर संघात स्थान मिळालेल्या जयंतने 4 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास कामगिरी केली नसल्याने तो संघाबाहेर होता.

भारतीय टेस्ट संघात श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्ण या नव्या खेळाडूंना जागा मिळाली असताना 4 वर्षानंतर संघात परतलेल्या जयंतने शेवटची कसोटी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. या सामन्यात त्याने दोन्ही डावात केवळ 1-1 विकेट घेतला होता. हा सामनाही भारताने 303 धावांनी गमावला होता. जयंतने त्याचा टेस्ट डेब्यू इंग्लंड विरुद्ध वाइजॅग येथे 2016 मध्ये केला होता. आतापर्यंत त्याने 4 टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 25 नोव्हेंबर ते  29 नोव्हेंबर पहिला टेस्ट सामना तर 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.

टी-20 मालिकेसाठी संघ यापूर्वीच जाहीर

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा मंगळवारी केली होती. टी-ट्वेन्टीच्या टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आलीय. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

हे ही वाचा

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

Video : सोने पे सुहागा, पाकच्या बोलरकडून दोन टप्प्यांचा बॉल, वॉर्नरने स्टेडियमबाहेर भिरकावला, फ्री हिटही मिळाली!

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

(India vs new zealand bcci announces test squad for series jayant yadav in team after 4 years)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.