IND vs NZ Warm up Match: भारत Vs न्यूजीलंड सामना उशिराने सुरु होणार, कारण…
IND vs NZ Warm up Match: ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध दुसरा सराव सामना होणार आहे.

ब्रिस्बेन: टीम इंडिया आज न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) दुसरा सराव सामना खेळणार आहे. दोन्ही टीम्स सुपर 12 मध्ये आधीच पोहोचल्या आहेत. टीम इंडिया याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना खेळली. या मॅचमध्ये टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला होता.
लास्ट ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने कमाल केली होती. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाकडे तयारीचा आढावा घेण्याची आजची शेवटची संधी आहे.
भारत-न्यूझीलंड सामन्यात व्यत्यय
ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध दुसरा सराव सामना होणार आहे. सध्या गाबामध्ये अचानक पाऊस सुरु झालाय. त्यामुळे मॅच वेळेवर सुरु होण्याची शक्यता कमी आहे. सध्या संपूर्ण मैदानावर कव्हर्स आहेत. आज संध्याकाळी 4.16 पर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहिली जाईल.
It’s raining here at The Gabba currently.
Cut off time for a 5 over-a-side game is 8.46 PM (4.16 PM IST)#INDvNZ pic.twitter.com/o2Aa56nSoN
— BCCI (@BCCI) October 19, 2022
रोहित शर्मावर सगळ्यांच्या नजरा
न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वॉर्मअप मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर नजर असेल. रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागच्या सामन्यात रोहितने धीमी फलंदाजी केली. राहुल 49 धावांवर होता. त्यावेळी रोहितच्या खात्यात फक्त 1 रन्स होता.
वॉर्मअप मॅचसाठीची टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा, दीपक हुड्डा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अश्विन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी,
