AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ | आज पहिली सेमीफायनल, एव्हरेज मॅन आणि चॅम्पियनच्या विचारात फरक असतो तो हाच

IND vs NZ Odi World Cup 2023 Semifinal Match | मोठ्या मॅचआधी सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी कसा विचार करतो आणि विराट कोहली, रोहित शर्मासारखे प्लेयर कसा विचार करतात ते समजून घ्या. अशा मोठ्या मॅचआधी खेळाडूंच्या डोक्यात काय चाललेल असतं. सेमीफायनल, फायनल अशा मॅचकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असतो, ते लक्षात घ्या.

IND vs NZ | आज पहिली सेमीफायनल, एव्हरेज मॅन आणि चॅम्पियनच्या विचारात फरक असतो तो हाच
Ind vs nz odi world cup 2023 semifinal match at mumbai wankhede stadiumImage Credit source: PTI
| Updated on: Nov 15, 2023 | 9:46 AM
Share

मुंबई : आज तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस. वनडे वर्ल्ड कप 2023 भारतात सुरु झाल्यापासून, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय़ तो दिवस अखेर आलाय. आपली टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. महत्त्वाच म्हणजे कुठे अडखळत, धडपडत नाही, तर थेट फेरारी कारसारखी सुसाट. जग जिंकायला निघालेल्या सिकंदरासारख टीम इंडियाचा यंदाच्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये परफॉर्मन्स आहे. टीम इंडियाचा अश्वमेध चौखूर उधळला आहे. जो कोणी वाटेत आडवा आला, त्याची पाठ टीम इंडियाने लोळवली आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या वर्ल्ड कपमधल्या प्रत्येक बलवान संघावर आरामात विजय मिळवलाय. मैदानावर टीम इंडियाने अगदी हुकूमशाह सारख राज्य केलय. नजरेची टाप कोणी वर करण्याची हिम्मत करणार नाही, असा धाक बुमराह, शमी आणि सिराजच्या चेंडूमध्ये आहे. बलवान योद्धे, विजयी वीरांसारखा खेळ आपली टीम इंडिया दाखवतेय.

आता फक्त एकच इच्छा आहे, आजची सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये त्याच दिमाखात, शानमध्ये प्रवेश करा. वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि टीम इंडियामध्ये फक्त दोन पावलाच अंतर आहे. रस्त्यात अडथळा आहे तो, शांत, थंड प्रदेशातून येणाऱ्या किवींचा. न्यूझीलंडच्या टीममध्ये कोणी कोहली, रोहित नाहीय. एखाद-दुसऱ्या स्टार खेळाडूवर ही टीम अवलंबून नाही. एक संघ म्हणून न्यूझीलंडची टीम उजवी आहे. म्हणा, आपणही एखाद-दुसऱ्या प्लेयरवर अवलंबून नाहीय. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियातल्याही प्रत्येक खेळाडूने आपल्या बाजूने योगदान दिलय. फक्त अशा मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात न्यूझीलंडची टीम थोडी सरस आहे. कारण मागच्या 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यानंतर 2021 च्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये याच न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता.

आज चोकर्सचा शिक्का पुसण्याचा दिवस

त्यामुळे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत किंवा साखळी फेरीत आपण न्यूझीलंडवर विजय मिळवला असला, तरी आजच्या सामन्यातील कामगिरी महत्त्वाची आहे. आज आपण कसे खेळतो, ते महत्त्वाच आहे. कारण आता संधी नाही. लीग स्टेजमध्ये एक सामना गमावल्यानंतरही दुसरी संधी असायची. आता तशी संधी मिळणार नाही. त्यामुळे आज आपल्या प्लेइंग 11 ला एका वेगळ्या लेव्हलचा खेळ दाखवावा लागेल. मागच्या काही वर्षात आयसीसी टुर्नामेंटमध्ये मोक्याच्या क्षणी हाराकिरी केल्यामुळे आपल्यावर चोकर्सचा शिक्का आहे. तो आज टीम इंडियाला पुसावाच लागेल आणि आपले खेळाडू तो पुसतीलच यात अजिबात शंका नाही.

सर्वसामन्य आणि मोठे खेळाडू यांच्यात फरक असतो तो हाच

चाहते म्हणून आपल्या मनात आज थोडी धाकधूक असेल. आपण वर्ल्ड कपमध्ये इतके चांगले खेळलोय, पण आज काही उलट होणार नाहीना? अशा शंका, भीती, प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. तुम्ही-आम्ही, सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी अशा मोठ्या मॅचआधी काय विचार करतात? तेच रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या मनात त्यावेळी काय विचार असतो, ते समजून घ्या. क्रिकेट एक्सपर्ट विक्रम साठये यांची नुकतीच एक मुलाखत झाली. एका मोठ्या वर्तमानपत्राने त्यांचा व्हिडिओ इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी विक्रम साठ्ये यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोठ्या मॅचआधी काय आणि कसा विचार करतात ते उलगडून सांगितलं. “पाकिस्तान विरुद्ध मॅच असेल, तर हरलो तर काय होईल? लोक काय म्हणतील? असा विचार आपण करतो. पण तेच सचिन तेंडुलकर, विराट कोहली पाकिस्तान किंवा अन्य कुठल्या टीम विरुद्ध मॅच असेल, तर उत्साहात असतात. अशाच महत्त्वाच्या सामन्यात ते उत्तम खेळ दाखवण्याचा 100 टक्के प्रयत्न करतात. कारण इथे खेळलो, तर मी मोठा होणार हे त्यांना ठाऊक असतं. सर्वसामान्य आणि चॅम्पियनमध्ये फरक असतो, तो हाच”

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.