
अर्शदीप सिंह याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकटे घेण्याची परंपरा न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या टी 20I सामन्यातही कायम ठेवली आहे. अर्शदीपने टीम सायफर्ट याला 5 धावांवर आऊट करत न्यूझीलंडला 17 धावांवर पहिला झटका दिला.
न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडकडून टीम सेफर्ट आणि फिन एलन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 13 पेक्षा अधिक धावांची गरज आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी धमाका केला आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 271 धावा केल्या आहेत. भारतासाठी इशान किशन याने सर्वाधिक 103 धावा केल्या. त्याशिवाय कॅप्टन सूर्याने 63, हार्दिकने 42 आणि ओपनर अभिषेक शर्मा याने 30 धावा केल्या. आता न्यूझीलंड 272 धावांच्या प्रत्युत्तरात किती धावांपर्यंत मजल मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जो येतोय तो फटकेबाजी करुन जातोय, भारतीय फलंदाजांनी अशी स्थिती न्यूझीलंडची पाचव्या टी 20i सामन्यात केली आहे. इशान, सूर्यानंतर हार्दिक पंड्या याने अवघ्या 17 चेंडूत 42 धावा ठोकल्या. हार्दिकने या खेळीत 4 षटकार आणि 1 चौकार लगावला.
इशान किशन शतकी खेळीनंतर आऊट झाला आहे. भारताने यासह चौथी विकेट गमावली आहे. इशानने 43 बॉलमध्ये 103 धावा केल्या. इशानने या खेळीत 10 षटकार आणि 6 चौकार लगावले.
इशान किशन याने 17 व्या ओव्हरमध्ये षटकार ठोकत चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. इशानने अवघ्या 42 चेंडूत शतक झळकावलं आहे. इशानचं हे टी 20i क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठरलंय.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतकानंतरही तडाखा कायम ठेवत फटकेबाजी केली. मात्र याच फटकेबाजीच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव याच्या खेळीचा शेवट झाला. सूर्याने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 63 रन्सची खेळी केली.
इशान किशन याच्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने 14 व्या ओव्हरमध्ये षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलंय. सूर्याने 26 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं.
इशान किशन याने सामन्यातील 12 व्या ओव्हरमध्ये इश सोढी याच्या बॉलिंगवर धमाका केला आहे. इशानने सोढीच्या बॉलिंगवर तब्बल 29 धावांची वसूली केली. इशानने इशच्या बॉलिंगवर 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर 1 धाव भारताला अतिरिक्तद्वारे (वाईड) मिळाली. इशान यासह 33 चेंडूत 75 धावांवर पोहचला.
इशान किशन याने न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. इशानने 12 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकत कारकीर्दीतील आठवं अर्धशतक झळकावलं. इशानचं हे या मालिकेतील एकूण दुसरं अर्धशतक ठरलं.
इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. तसेच टीम इंडियाच्या 100 धावाही पूर्ण झाल्या आहेत. भारताने 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 102 धावा केल्या आहेत. सूर्या 27 आणि इशान 39 धावांवर नाबाद खेळत आहेत.
न्यूझीलंडने टीम इंडियाच्या सलामी जोडीला झटपट आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. संजू सॅमसन 6 आणि अभिषेक शर्मा 30 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे भारताची धावसंख्या 5 ओव्हरनंतर 2 आऊट 48 अशी झाली. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने भारताला सावरलं आहे. या दोघांनी नवव्या ओव्हरपर्यंत 24 बॉलमध्ये 34 रन्सची पार्टनरशीप केली आहे.
लॉकी फर्ग्यूसन याने भारताच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. लॉकीने तिसऱ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसन याला आऊट करत भारताला पहिला झटका दिला. त्यानंतर लॉकीने पाचव्या षटकांत अभिषेक शर्मा याला आऊट केलं. अभिषेकने 30 धावा केल्या.
टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन हा पाचव्या सामन्यातही अपयशी ठरला आहे. संजू तिसऱ्या ओव्हरमध्ये आऊट झालाय. संजूच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. संजूने 6 बॉलमध्ये 6 रन्स केल्या.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या भारताच्या सलामी जोडीने चाबूक सुरुवात केली आहे. या दोघांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये बिनबाद 29 धावा केल्या आहेत. अभिषेक 24 आणि संजू 5 धावांवर नाबाद खेळत आहेत.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय केला आहे. भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
टीम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेव्हॉन जेकब्स, मिचेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन आणि जेकब डफी.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
टीम इंडियाने पाचव्या टी 20i सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरुद्ध तिरुवनंतरपुरममधील या मैदानात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण आहे आणि कोण नाही? हे आपण जाणून घेऊयात.
डेव्हॉन कॉनव्हे, टीम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी, जेम्स नीशम, मायकेल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, बेव्हॉन जेकब्स आणि काइल जेमिसन.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, इशान किशन, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध सलग 3 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. तर न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. आता या 5 सामन्यांच्या मालिकेतील फायनल मॅचचं आयोजन हे तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधीचा शेवटचा सामना आहे. त्यामुळे दोघांमध्येही हा सामना जिंकण्याची चुरस आहे. अशात आता टीम इंडिया ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकणार की न्यूझीलंड सीरिजचा शेवट 3-2 ने करण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.