
सॅम अय्युब याने इशान किशन याच्या स्फोटक खेळीला ब्रेक लावला आहे. सॅमने इशानला बोल्ड केलं आहे. इशानने सॅमच्या बॉलिंगवर जागा करुन फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात इशानचा अंदाज चुकला आणि बॉल थेट स्टंपवर लागला. इशान अशाप्रकारे आऊट झाला. इशानने 40 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 77 रन्स केल्या.
इशान किशन याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. इशानने सातव्या ओव्हरमधील सलग पहिल्या 2 बॉलवर फोर लगावले. इशानने यासह अर्धशतक पूर्ण केलं.
पाकिस्तानने टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अभिषेक शर्मा सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर इशान किशन याला साथ देण्यासाठी तिलक वर्मा मैदानात आला. इशान आणि तिलर या जोडीने भारताला 4 ओव्हरपर्यंत 30 रन्सपर्यंत पोहचवलंय. इशान 25 आणि तिलक 5 धावांवर नाबाद खेळत आहेत.
टीम इंडियाला अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. त्याला खातंही खोलता आलं नाही. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी अमेरिकेविरुद्ध खातं खोलू शकला नव्हता.
भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन ही जोडी मैदानात आली आहे. अभिषेक शर्मा आजारपणातून बरा होऊन मैदानात परतला आहे. त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आम्ही शेवटचे दोन सामने बचाव करताना जिंकले होते म्हणून आम्हाला ते बदलायचे नाही. हा एक प्रसंग आहे, हा एक महत्त्वाचा सामना आहे. हा खेळ तुम्हाला खूप काही शिकवतो, कोणताही संघ दिलेल्या दिवशी सामना जिंकू शकतो. दोन बदल केले आहेत. अभिषेक शर्मा आला आहे आणि अर्शदीप सिंगऐवजी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.
आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. ते थोडे चिकट दिसते, म्हणून आम्हाला वाटते की ते पहिल्या काही षटकांसाठी गोलंदाजांना मदत करेल म्हणून आम्हाला ते वापरायचे आहे. आम्ही आमच्या गटात आरामशीर आहोत आणि या आव्हानासाठी उत्सुक आहोत. एसएससीपेक्षा मोठे मैदान आणि खेळपट्टी एसएससीपेक्षा हळू आहे. आम्ही त्याच संघासह खेळणार आहोत.
नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करून जास्तीत जास्त धावा कराव्या लागणार आहेत. कारण नंतर दव पडलं तर गोलंदाजी करणं कठीण जाईल.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे खेळाडू हॉटेलमधून बसद्वारे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये अवघ्या काही मिनिटांपूर्वी दाखल झाले आहेत. आता थोड्याच मिनिटात टॉस होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला आता मोजून 1 तास बाकी आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या टॉसकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
कोलंबोमधील हवामान बदलत आहे. पावसाचे अंदाज बदलत आहेत. बीबीसी वेदरनुसार, कोलंबोमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता पावसाची शक्यता 40 टक्के आहे. 7.30 वाजता ही शक्यता 32 टक्के आहे. रात्री 8.30 वाजता ही शक्यता 20 टक्क्यांपर्यंत कमी असणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाशी हस्तांदोलन करणे टाळेल. गेल्या वर्षीच्या आशिया कपमध्येही अशीच घटना घडली होती.
आतापर्यंत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 16 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 16 पैकी सर्वाधिक 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया कोलंबोत पाकिस्तावर मात करत 13 वा विजय नोंदवणार का? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.
सलमान आगा (कॅप्टन), साहिबजादा फरहान, बाबर आझम, उस्मान खान (विकेटीकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक आणि अबरार अहमद.
अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और वरुण चक्रवर्ती.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांची 15 फेब्रुवारीला आयसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची नववी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान केवळ 1 सामन्यातच विजय मिळाला आहे.
टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एकाच ग्रुपमध्ये आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याआधी दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने खेळले आहेत. दोन्ही संघाने आपली दोन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडिया नेट रनरेट चांगला असल्या ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला अवघ्या काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. इंडियन्स एक्सप्रेसनुसार, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगासह हस्तांदोलन करणार नाही. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सूर्याला हस्तांदोलनबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. सूर्याने यावर 24 तास थांबा, असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे हस्तांदोलन होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता सूर्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे.
सलमान आगा (कर्णधार), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक, फखर जमान, नसीम शाह, सलमान मिर्झा आणि ख्वाजा नाफे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटीकप), संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करणअयात आला आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील एकूण तिसरा क्रिकेट सामना आहे.
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांना आज 15 फेब्रुवारीला सर्वात मोठा सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील तिसरा सामना आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा सामना त्रयस्थ ठिकाणी करण्यात आलं असलं तरी चाहत्यांनी स्टेडियम भरलेलं आहे. भारत टी 20I वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर विरुद्ध वरचढ राहिली आहे. तरीही या सामन्यात कोण विजयी होणार? याची उत्सूकता चाहत्यांना आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.