AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभवला आरामाची गरज नाही..! 15 वर्षीय खेळाडूसाठी कोणी केली बॅटिंग? 2027 वर्ल्डकपबाबत म्हणाले…

वैभव सूर्यवंशीचं अखेर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळला आणि आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला सुरूवात झाली. आता त्याला जास्तीत जास्त संधी देण्याची मागणी होत आहे.

वैभवला आरामाची गरज नाही..! 15 वर्षीय खेळाडूसाठी कोणी केली बॅटिंग? 2027 वर्ल्डकपबाबत म्हणाले...
वैभवला आरामाची गरज नाही..! 15 वर्षीय खेळाडूसाठी कोणी केली बॅटिंग? 2027 वर्ल्डकपबाबत म्हणाले...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 05, 2026 | 9:51 PM
Share

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यांचा खेळ संपला असून इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण हा सामना खास ठरला तो 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी.. या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 15 वर्षे आणि 99 दिवस वय असताना त्याने आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीतला पहिला सामना खेळून विक्रम नोंदवला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूंचा सामना केला आणि 14 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने दोन उत्तुंग षटकार मारले. त्याची खेळी पाहून माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वैभव सूर्यवंशीला जास्तीत जास्त संधी आणि सलग सामने खेळवण्याची मागणी केली आहे. सध्या त्याला आराम देण्याची गरज नाही असंही म्हंटलं आहे.

वैभव सूर्यवंशीला आराम का देऊ नये?

वैभव सुर्यवंशीचा पदार्पणाचा सामना अपेक्षेप्रमाणे झाला नाही. पण भविष्यात काही तरी मोठं करेल याचे संकेत मात्र मिळाले आहे. कारण त्याचा आक्रमक बाणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कायम होता. त्यामुळे त्याने जास्तीत जास्त सामने खेळावे ही इच्छा प्रत्येक चाहत्याची आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला जास्तीत जास्त संधी देण्याची शिफारस होत आहे. माजी फिरकीपटू शिवरामकृष्ण यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, वैभवने आता न थांबता खेळायला हवं. त्यामुळे त्याला कमी वयात बरंच काही शिकता येईल.

माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन यांनी वयाच्या 17व्या वर्षी पदार्पण केलं होतं. त्यांनी वैभवबाबत सांगितलं की, ‘त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अपेक्षित संधी दिल्या पाहीजेत आणि कशी कामगिरी करतो हे पाहिलं पाहीजे. युवा खेळाडूला संधी दिल्यानंतर आराम देणं हे काही योग्य ठरणार नाही. त्याला आरामाची गरज नाही. तो पूर्ण वर्षभर खेळू शकतो. दीर्घ काळ फलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि मानसिकतेवर काम करण्यास यामुळे मदत होईल.’

वैभवला 2027 वनडे वर्ल्डकपसाठी तयार करा

शिवरामकृष्णन यांनी वैभवची स्तुती करत कर्णधार, प्रशिक्षक आणि संघातील इतर खेळाडूंनी त्याच्या प्रतिभेला पूर्ण पाठिंबा देण्याची गरज आहे. शिवरामकृष्णन म्हणाले की, ‘वैभव काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला तरी त्याला संधी दिली पाहीजे.’ इतकंच काय तर त्यांनी त्याला वनडे क्रिकेटमध्येही संधी देण्याची मागणी केली. वैभव सूर्यवंशीला 2027 वनडे वर्ल्डकपसाठी पर्याय म्हणून तयार करता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...