AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Recharge : जिओचे सिम वापरताय? 70 दिवसांचा खास प्लॅन; कॉलिंग, डेटा-AI सगळंच फ्री

Jio Recharge Plan : तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीचा 70 दिवसांचा एक प्लॅन तुमच्यासाठी खास ठरू शकतो. या प्लॅनची माहिती जाणून घेऊयात.

Jio Recharge : जिओचे सिम वापरताय? 70 दिवसांचा खास प्लॅन; कॉलिंग, डेटा-AI सगळंच फ्री
Jio 666 Recharge plan DetailsImage Credit source: Google
| Updated on: Jul 05, 2026 | 9:45 PM
Share

भारतात जिओचे 51 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत, तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जास्त व्हॅलिडिटी, दररोज डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अतिरिक्त AI फायदे असलेला प्रीपेड रिचार्ज प्लान शोधत असाल, तर 666 चा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबतच मर्यादित कालावधीसाठी गुगल जेमिनी प्रोचे चे 18 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जिओचा 666 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनची 70 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये एकूण 105GB डेटा मिळतो. मात्र, दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधाही दिली जाते. मनोरंजनासाठी JioTV चे ॲक्सेस मिळते, तर क्लाउड स्टोरेजसाठी JioAICloud चा लाभही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.

गुगल जेमिनी प्रोचे मोफत सबस्क्रिप्शन

जिओच्या प्लॅनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गुगल जेमिनी प्रोचे 18 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ऑफरची अंदाजे किंमत 35,100 रुपये इतकी आहे. या सबस्क्रिप्शनअंतर्गत ग्राहकांना 5TB (5000GB) क्लाउड स्टोरेज, गुगल जेमिनीचे प्रगत AI फीचर्स आणि इतर प्रीमियम सुविधा वापरण्याची संधी मिळते.

व्हॅल्यू फॉर मनी

तुम्ही नियमितपणे जास्त डेटा वापरत असाल आणि AI टूल्स तसेच क्लाउड स्टोरेजचाही लाभ घ्यायचा असेल, तर 666 रुपयांचा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पर्याय ठरू शकतो. मात्र, रिचार्ज करण्यापूर्वी कंपनीच्या अटी व शर्ती नक्की तपासा, जेणेकरून ऑफरशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल.

दरम्यान, कंपनीकडे दररोज 1.5 जीबी डेटासाठी 579 आणि 889 रुपयांचेही प्लॅन आहेत. 579 रुपांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते, तर 889 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याशिवाय 329 रुपयांचाही प्लॅन आहे, ज्यात तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. त्यामुळे तुम्ही बजेटनुसार हे प्लॅनही निवडू शकता.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा