AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2022: IND vs PAK पाकसमोर संकट, शाहीन शाह आफ्रिदीला ऑप्शन कोण?

Asia cup 2022: आता शाहीन शाह आफ्रिदीचा पर्याय शोधावा लागेल. पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीची जागा भरुन काढणारा गोलंदाज हवा आहे. ज्याच्याकडे वेग, टप्पा आणि अनुभव असेल. त्यात तो डावखुरा गोलंदाज निघाला, तर फायदाच आहे.

Asia cup 2022: IND vs PAK पाकसमोर संकट, शाहीन शाह आफ्रिदीला ऑप्शन कोण?
Shaheen-AfridiImage Credit source: twitter
| Updated on: Aug 21, 2022 | 3:07 PM
Share

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानसमोर अडचण निर्माण झाली आहे. आशिया कप मध्ये भारताला पराभूत करण्याच्या त्यांच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. पाकिस्तानला (Pakistan)  आता शाहीन शाह आफ्रिदीचा पर्याय शोधावा लागेल. पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीची जागा भरुन काढणारा गोलंदाज हवा आहे. ज्याच्याकडे वेग, टप्पा आणि अनुभव असेल. त्यात तो डावखुरा गोलंदाज निघाला, तर फायदाच आहे. फक्त शाहीन शाह आफ्रिदीची जागा घेणारा तो गोलंदाज कोण असेल?. शाहीन शाह आफ्रिदी आशिया कप मधून बाहेर गेल्यानंतर आता मोहम्मद आमिर ट्रेंड होत होता. वहाब रियाजच नावही समोर आलं. पण नंतर तो दुखापतग्रस्त असल्याचं कळलं. या दोन्ही गोलंदाजांमध्ये शाहीन शाह आफ्रिदीसारखी क्षमता आहे. ते सुद्धा डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. मोहम्मद आमिर रिटायर झाला आहे. वहाब रियाज दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे पाकिस्तान या दोघांची निवड करु शकत नाही.

हसन अलीवर पाकिस्तान विश्वास दाखवेल?

पाकिस्तानकडे अजून एक अनुभवी गोलंदाज आहे, हसन अली. पाकिस्तानने हसन अलीला आशिया कपसाठीच नाही, तर नेदरलँड विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी सुद्धा निवडलेलं नाही. तो आऊट ऑफ फॉर्म आहे. आता ज्याला पाकिस्तानने आधीच निवडलेलं नाही. त्याला पाकिस्तान आता कसा निवडणार? हा प्रश्न आहे. भारताविरुद्ध हसन अली 5 वनडे आणि 1 टी 20 सामना खेळलाय.

मीर हामजाचा पर्याय

शाहीन आफ्रिदीचा पर्याय म्हणून एक धक्का देणारं नाव समोर येतय. मीर हामजा हा 29 वर्षांचा गोलंदाज आहे. सध्या तो काश्मीर प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. मीर हामजाकडे आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या नावावर फक्त एक कसोटी सामना आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 साली तो हा कसोटी सामना खेळला होता. पाकिस्तानी क्रीडा पत्रकार मीर हामजाच्या नावाची चर्चा करतायत. आशिया कपसाठी मीर हामजा सरप्राइज पॅकेज ठरेल, असं म्हटलं जातय.

हसनैनला पाकिस्तान संधी देईल?

शाहीन शाह आफ्रिदीच्या जागी पाकिस्तानकडे मोहम्मद हसनैनचाही एक पर्याय आहे. 22 वर्षांचा हा युवा पाकिस्तानी गोलंदाज सध्या ‘द हण्ड्रेड’ स्पर्धेत खेळतोय. ओव्हल इन्विंसिबलचा तो दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. हसनैन पाकिस्तानसाठी 18 टी 20 आणि 8 वनडे सामने खेळलाय. भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे नाहीय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.