INDW vs PAKW Womens T20 WC Score Highlights : भारताची पाकिस्तानला नमवत विजयी सलामी, 64 धावांनी केलं पराभूत

India vs Pakistan, Womens T20 World Cup 2026 Score and Highlights Updates: बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

INDW vs PAKW Womens T20 WC Score Highlights : भारताची पाकिस्तानला नमवत विजयी सलामी, 64 धावांनी केलं पराभूत
INDW vs PAKW Live Cricket Score
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 15, 2026 | 2:24 AM

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमेनसामने होते.सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाने हा सामना जिंकत विजयी सलामी दिली. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा टी 20i वर्ल्ड कपमधील एकूण सातवा विजय ठरला.  उपकर्णधार स्मृती मंधाना आणि ऑलराउंडर दीप्ती शर्मा या दोघी भारताच्या विजयाच्या नायिका ठरल्या. भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृतीने केलेल्या सर्वाधिक 68 धावांमुळे भारताला 170 रन्सपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17 ओव्हरमध्ये 106 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानला ऑलआऊट करण्यात दीप्ती शर्मा हीने प्रमुख भूमिका बजावली. दीप्तीने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली. भारताने अशाप्रकारे पाकिस्तानला पराभूत केलं.

 

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 14 Jun 2026 10:27 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : भारताने पाकिस्तानला नमवत दिली विजयी सलामी, 64 धावांनी केलं पराभूत

    दीप्ती शर्माने एकाच षटकात तीन विकेट काढल्या आणि पाकिस्तानला पराभवाचा दणका दिला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानचा संघ 106 धावा करू शकला.  भारताने पाकिस्तानला 64 धावांनी पराभूत केलं. दीप्ती शर्माने आलिया रियाज, तास्मिया रुबाब आणि नाशरा संधूची विकेट काढली. 17 षटकाच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट काढली.

  • 14 Jun 2026 10:25 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानचा पराभव निश्चित, आठवा खेळाडू तंबूत

    पाकिस्तानला आलिया रियाझच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या धडाधड विकेट पडत आहे. हातात दोन विकेट शिल्लक आहे आणि धावांचा डोंगर आहे. त्यामुळे भारताचा विजय पक्का आहे.


  • 14 Jun 2026 10:19 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानला सातवा धक्का

    पाकिस्तानला रमीन शमिमच्या रुपाने सातवा धक्का बसला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान पराभूत होणार निश्चित झालं आहे. कारण धावा आणि चेंडूमधील अंतर वाढलं आहे. त्यात शेपटच्या फलंदाजांना हे गणित सोडवणं कठीण आहे. रमीन शमिम फक्त 4 धावा करून तंबूत परतली.

  • 14 Jun 2026 10:04 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत, फातिमानंतर परवेज बाद

    भारतीय संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विजयाच्या वाटेवर आहे. पाकिस्तानचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला आहे. फातिमा सानानंतर नातियाला परवेज तंबूत परतली आहे. तिच्या रुपाने पाकिस्तानला सहावा धक्का बसला आहे.

  • 14 Jun 2026 10:02 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानला पाचवा धक्का, फातिमा साना बाद

    पाकिस्तानला कर्णधार फातिमा सानाच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. तिला खातंही खोलता आलं नाही. मुनीबा अली बाद झाल्यानंतर मैदानात उतरली होती. पण शफाली वर्माने तिला तीन चेंडूत तंबूत पाठवलं.

  • 14 Jun 2026 09:57 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानला चौथा धक्का, मुनीबा अली बाद

    पाकिस्तानला मुनीबा अलीच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. खरं तर मुनीबा अलीने चांगला जम बसवला होता. पण 41 धावांवर असताना धावचीत झाली आणि भारतीय संघाच्या बाजूने सामना अधिक झुकला.

  • 14 Jun 2026 09:44 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानला तिसरा झटका, सायरा जबीन आऊट, टीम इंडियाचं कमबॅक

    टीम इंडियाने पाकिस्तानला तिसरा झटका दिला आहे. श्री चरणी हीने आपल्या बॉलिंगवर सायरा जबीन हीला कॅप्टन हरमनप्रीत कौर हीच्या हाती कॅच आऊट केलं आहे. सायराने 3 बॉलमध्ये 2 रन्स केल्या.

  • 14 Jun 2026 09:34 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानला दुसरा झटका, आयेशा झफर आऊट

    दीप्ती शर्मा हीने पाकिस्तानला दुसरा झटका दिला आहे.  दीप्ती शर्मा हीने आयेशा झफर हीला स्मृती मंधाना हीच्या हाती कॅच आऊट केलं. आयेशाने 8 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.

  • 14 Jun 2026 09:23 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : टीम इंडियाला पहिलं यश, गुल फिरोझा आऊट

    टीम इंडियाने पाकिस्तानला पहिला झटका दिला आहे. दीप्ती शर्मा हीने गुल फिरोझा हीला भारती फुलमाळी हीच्या हाती कॅच आऊट केलं. गुल फिरोझा हीने 12 धावा केल्या.

  • 14 Jun 2026 09:19 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानची जबरदस्त सुरुवात, टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात

    मुनीबा अली आणि गुल फिरोझा या सलामी जोडीने पाकिस्तानला टीम इंडिया विरुद्ध जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. सलामी जोडीने 4 ओव्हरमध्ये बिनबाद 37 रन्स केल्या आहेत.  मुनीबा 23 आणि फिरोझा 12 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 14 Jun 2026 09:02 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : पाकिस्तानच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 171 धावांचं आव्हान

    पाकिस्तानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानकडून मुनीबा अली आणि गुल फिरोझा ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 14 Jun 2026 08:48 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : ऋचा घोषचा फिनिशिंग टच, टीम इंडियाच्या 170 धावा

    विकेटकीपर बॅट्समन ऋचा घोष हीने केलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 170 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 170 धावा केल्या आहेत. आता टीम इंडियाचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 14 Jun 2026 08:38 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : ऋचा घोषची फटकेबाजी, टीम इंडिया 150 पार

    टीम इंडियाने 19 व्या ओव्हरमध्ये 150 धावांचा टप्पा पार केला आहे. ऋचा घोष हीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 19 व्या ओव्हरमध्ये एकूण 23 धावा मिळवल्या.

  • 14 Jun 2026 08:25 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : हरमनप्रीत कौर आऊट, भारताला पाचवा झटका, पाकिस्तानचं कमबॅक

    पाकिस्तानने टीम इंडियाला मोठा आणि पाचवा झटका दिला आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौर आऊट झाली आहे. हरमनप्रीतने 35 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. टीम इंडियाचा स्कोअर 16.3 ओव्हरमध्ये 5 आऊट 123 असा झाला आहे.

  • 14 Jun 2026 08:16 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : भारती फुलमाळी आऊट, टीम इंडियाला तिसरा झटका

    पाकिस्तानने टीम इंडियाला झटपट 2 झटके दिले आहेत. स्मृती मंधाना हीच्यानंतर भारती फुलमाळी आऊट झालीय. भारतीने 1 धाव केली आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला आहे.

  • 14 Jun 2026 08:13 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : स्मृती मंधानाच्या स्फोटक खेळीचा शेवट, भारताला तिसरा धक्का

    उपकर्णधार स्मृती मंधाना हीच्या स्फोटक खेळीचा शेवट झाला आहे. पाकिसतानने भारताला तिसरा धक्का दिला आहे. स्मृती मंधाना 68 धावांवर आऊट झाली. स्मृतीने 44 चेंडूंच्या या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले.

  • 14 Jun 2026 07:55 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : स्मृती मंधानाचा तडाखा, पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक

    भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने पाकिस्तान विरुद्ध चाबूक बॅटिंग केली आहे. स्मृतीने अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. स्मृृतीने चौकाराह अर्धशतक पूर्ण केलंय.

  • 14 Jun 2026 07:54 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : टीम इंडिया मजबूत स्थितीत, स्मृती मंधान अर्धशतकाच्या दिशेने

    हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना ही जोडी जमली आहे. दोघींनी 47 बॉलमध्ये 58 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आहे. भारताने 11 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 74 धावा केल्या आहेत. स्मृती 44 आणि हरमनप्रीत 11 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 14 Jun 2026 07:31 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : स्मृती-हरमनप्रीतने भारताचा डाव सावरला, मोठ्या भागीदारीची गरज

    पाकिस्तानने भारतीय संघाला पावरप्लेमध्ये 2 झटके देत चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी भारताचा डाव सावरला आहे. या दोघांनी भारताला 6 ओव्हरमध्ये 2 आऊट 38 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. स्मृती 25 आणि हरमनप्रीत 4 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 14 Jun 2026 07:18 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : जेमिमाह रॉडिग्स आऊट, भारताला दुसरा झटका, सुमार सुरुवात

    भारतीय संघाने सुमार सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारताला पावर प्लेमध्ये दुसरा झटका दिला आहे. शफाली वर्मा 6 धावा करुन आऊट झाली. त्यानंतर पाकिस्तानने भारताला दुसरा झटका दिला आहे. तास्मिया रुबाब हीने जेमिमाह रॉडिग्स हीला आऊट करत भारताला दुसरा झटका दिला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर हा 3.2 ओव्हरमध्ये 2 आऊट 18 असा झाला आहे.

  • 14 Jun 2026 07:07 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : शफाली वर्मा आऊट, टीम इंडियाला पहिला झटका

    शफाली वर्मा हीने पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकून वर्ल्ड कप मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली. मात्र पाकिस्तानने टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे.  सादीया इक्बाल हीने शफाली वर्माला पाचव्या बॉलवर मुनीबा अली हीच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 14 Jun 2026 07:05 PM (IST)

    INDW vs PAKW Live Score Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, शफाली-स्मृती मैदानात

    भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे. हे दोघे भारताला कशी सुरुवात मिळवून देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 14 Jun 2026 06:56 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : पाकिस्तान वुमन्स टीम प्लेइंग इलेव्हन

    पाकिस्तान वुमन्स टीम प्लेइंग इलेव्हन : गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), आयशा जफर, सायरा जबीन, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), रमीन शमीम, नशरा संधू, तस्मिया रुबाब आणि सादिया इक्बाल.

  • 14 Jun 2026 06:55 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी आणि क्रांती गौड.

  • 14 Jun 2026 06:34 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, पाकिस्तान विरुद्ध बॅटिंग

    वुमन्स टीम इंडियाच्या बाजूने मोठ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे.  भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौल हीने फलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 14 Jun 2026 06:21 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : थोड्याच मिनिटांत टॉस, कोण जिंकणार?

    टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणँ महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 14 Jun 2026 06:14 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : हेड टु हेड रेकॉर्ड्स, टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ

    आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला 8 पैकी 6 सामन्यांत पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानला केवळ 2 सामनेच जिंकता आले आहेत.

  • 14 Jun 2026 05:48 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : पाकिस्तान वुमन्स टीम

    पाकिस्तान वुमन्स टीम:  फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सायरा जबीन, आयशा जफर, इरम जावेद, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, आयमान फातिमा, डायना बेग, नशरा संधू, रामीन शमीम, सादिया इक्बाल, तुबा हसन आणि तस्मिया रुबाब.

  • 14 Jun 2026 05:44 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : वुमन्स टीम इंडिया

    वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटरीपर) स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरणी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, यास्तिका भाटिया आणि नंदनी शर्मा.

  • 14 Jun 2026 05:42 PM (IST)

    INDW vs PAKW Live Updates : भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामना किती वाजता?

    क्रिकेट चाहत्यांना आज रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा हा 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे कोणता संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us