
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून होतं. या सामन्यात 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये महामुकाबला खेळवण्यात आला. टीम इंडियाने या सामन्यात पाकिस्तान पराभूत करत वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत 247 धावांचा यशस्वी बचाव केला. भारताने पाकिस्तानला 43 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केलं.यासह भारताने पाकिस्तान विरुद्ध सलग 12 विजय साकारला.
टीम इंडियाची युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौड हीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. क्रांतीने 10 ओव्हरमध्ये 2 च्या इकॉनॉमीने अवघ्या 20 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. तिच्या या कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करत विजयी पंच लगावला आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला आहे.
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. भारताने विजयासाठी 247 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानचा डाव फक्त 159 धावांवर आटोपला. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताने वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा सलग 12 वा पराभव केला आहे. आतापर्यंत पाकिस्तानला एकही सामना भारताविरुद्ध जिंकता आलेला नाही. भारताने सुरुवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवत 4 गुण आणि +1.505 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं.
पाकिस्तानला नववा धक्का देत भारताने विजय पक्का केला आहे. आता भारतीय संघ विजयापासून एक विकेट दूर आहे. डायना बेग रनआऊट झाली आणि भारताने विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भारताकडून क्रांती गौडने चांगली गोलंदाजी केली.
पाकिस्तानची महत्त्वाची विकेट मिळाल्याने भारताचा विजय आता पक्का झाला आहे. सिद्रा अमीन 81 धावा करून बाद झाली. तिची विकेट स्नेह राणाने काढली.
टीम इंडियाने सलग दुसऱ्या विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला सातवा झटका दिला आहे. त्यामुळे टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध विजयासाठी आता फक्त 3 विकेट्सचीच गरज आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानची या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना 34 ओव्हरमध्ये 5 आऊट 122 अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान विजयासाठी आणखी 16 ओव्हरमध्ये 126 रन्सची गरज आहे. तर टीम इंडियाला पाकिस्तान विरूद्धच्या सलग 12 व्या विजयासाठी 5 विकेट्सची गरज आहे.
टीम इंडियाने 7 धावांच्या मोबदल्यात 2 झटके देत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. क्रांती गौड हीने नतालिया परवेज हीला 32 धावांवर आऊट केलं. तर दीप्ती शर्मा हीने कॅप्टन फातिमा सना हीला स्मृती मंधाना हीच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे पाकि्सतानचा स्कोअर 30.5 ओव्हरनंतर 5 आऊट 102 असा झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी आणखी 146 रन्सची गरज आहे.
पाकिस्तानने 24 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 81 धावा केल्या आहेत. नतालिय परवेज आणि सिद्रा आमिन या जोडीने पाकिस्तानला सावरलं आहे. या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ही सेट जोडी डोकेदुखी ठरण्याआधी फोडण्याचा प्रयत्न आहे.
टीम इंडियाने 248 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला झटपट 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. त्यामुळे पाकिस्तानची 11.1 ओव्हरमध्ये 3 आऊट 26 अशी स्थिती झाली. त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानला आणखी बॅकफुटवर ढकलत सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. पाकिस्तानने 18 ओव्हरपर्यंत 3 विके्टस गमावून 47 धावा केल्या आहेत.
आलिया रियाझच्या रुपाने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला आहे. क्रांती गौडच्या गोलंदाजीवर सेकंड स्लीपला असलेल्या दीप्ती शर्माच्या हाती झेल देत बाद झाली. या विकेटमुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे.
पाकिस्तानने पॉवर प्लेच्या 10 षटकात 2 गडी गमवून 25 धावा केल्या आहेत. यामुले पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव वाढला आहे. आणखी दोन विकेट झटपट बाद झाल्या तर भारताला मोठी संधी मिळेल.
पाकिस्तानने 248 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. भारताच्या हातून काही संधी सुटल्या. पण अखेर यश मिळालं. सदाफ शमासची विकेट क्रांती गौडने काढली. त्यामुळे भारताच्या खात्यात दोन विकेट आल्या आहेत.
पाकिस्तानला मुनीबा सिद्दीकीच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. मुनीबा अली दुर्दैवी ठरली. कारण दीप्ती शर्माने थ्रो केला तेव्हा तिची बॅट हवेत होती. त्यामुळे तिला धावचीत दिलं गेलं.
भारताने विजयासाठी दिलेल्या 248 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सावध सुरूवात केली आहे. भारतीय गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत. विकेट मिळाली तर दबाव टाकता येईल. यात भारताने पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिव्ह्यू गमावला.
पहिल्याच चेंडूवर भारताचा रिव्ह्यू वाया गेला. रेणुका ठाकुरच्या गोलंदाजीवर ऋचा घोषने मागे झेल घेतला. पण पॅड लागल्याचं स्पष्ट झालं.
भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 247 धावा केल्या आहे. तसेच विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं आहे. ऋचा घोषने शेवटी फटकेबाजी करत संघाला या धावसंख्येवर पोहोचवलं. आता पाकिस्तानला या धावसंख्येच्या आत रोखणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पाकिस्तानने वनडे क्रिकेटमध्ये 243 धावांचं सर्वात मोठं आव्हान गाठलं आहे.
क्रांती गौड 4 चेंडूत 8 झाला करून बाद झाली आहे. यासह भारताला नववा धक्का बसला आहे. यामुळे शेवटच्या षटकात धावसंख्येला ब्रेक बसला. डायना बेगच्या गोलंदाजीवर अलिया रियाझने तिचा झेल घेतला. त्यानंतर रेणुका सिंग ठाकुर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात आली आणि पहिल्या चेंडूवर झेल बाद झाली.
टीम इंडियाला श्री चरणीच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. तिने 5 चेंडूंचा सामना करत 1 धाव करून बाद झाली. सादिया इकबालच्या गोलंदाजीवर नतालिया परवेझने तिचा झेल पकडला. यामुळे धावसंख्येला ब्रेक बसला.
टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या आहेत. स्नेह राणा हीच्यानंतर दीप्ती शर्मा आऊट झाली आहे. दीप्ती शर्मा हीने 25 धावा केल्या. दीप्ती आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर हा 45.3 ओव्हरमध्ये 7 आऊट 203 असा झाला आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाला सहावा झटका दिला आहे. भारताने 159 धाावांवर पाचवी विकेट गमावली. त्यानंतर स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा या जोडीने 42 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्नेह राणा टीम इंडियाच्या 201 धावा असताना आऊट झाली. स्नेहने 33 बॉलमध्ये 20 रन्स केल्या.
दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा या जोडीने टीम इंडियाला 200 पार पोहचवलं आहे. भारताने 159 धावांवर पाचवी विकेट गमावली होती. त्यानंतर दीप्ती आणि राणा या जोडीने भारताला पुढे नेलं. त्यानंतर स्नेहने चौकार ठोकून टीम इंडियाला 200 पार पोहचवलं. भारतचा स्कोअर 44.1 ओव्हरनंतर 5 आऊट 201 असा झाला आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांना पाकिस्तान विरुद्ध चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही भारतासाठी मोठी खेळी करता आली नाही. स्मृती मंधना, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स आणि इतरांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र हे फलंदाज बाद झाले. त्यामुळे भारताची 35 ओव्हरनंतर 159 रन्सवर 5 विकेट अशी स्थिती झाली. त्यामुळे आता टीम इंडियाला पाकिस्तानसमोर अवघड आव्हान ठेवायचं असेल तर मोठी भागीदारी करावी लागणार आहे. सध्या स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा ही जोडी खेळत आहे. आता या दोघी भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाला पाचवा झटका दिला आहे. नशरा संधू हीने जेमिमाह रॉड्रिग्स हीला आऊट केलं आहे. जेमिमाहने 37 बॉलमध्ये 5 फोरसह 32 रन्स केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 35 ओव्हरनंतर 5 आऊट 159 असा झाला आहे.
भारत पाकिस्तान सामन्यात पावसाळी किटकांनी मैदानात हैदोस घातला आहे. त्यामुळे खेळाडूंना त्रास होत आहे. त्यामुळे काही काळ सामना थांबवून मैदानात फवारणी करण्यात आली होती. आता धूरवाला मैदानात आला आहे.
भारताला 151 धावांवर चौथा धक्का बसला आहे. हरलीन 46 धावा करून बाद झाली आहे. दीप्ती शर्मा मैदानात आली असून तिच्याकडून अपेक्षा आहेत.
भारताने 33 षटकं खेळत 151 धावांपर्यंत मजल मारली आहे. हरलीन आणि जेमिमा यांची जोडी जमली असून 250 च्या पार धावा होतील असं दिसत आहे.
जेमिमा रॉड्रिग्सला दुसऱ्यांदा नशिबाची साथ मिळाली. पहिल्या झेलबाद झाली होती. तेव्हा नो बॉल पडला. त्यानंतर रनआऊट होता होता वाचली. त्यामुळे तिला दोनदा जीवदान मिळालं.
भारतीय संघाला जेमिमा रॉड्रिग्सच्या रुपाने चौथा धक्का बसला होता. पंचांनी बाद असल्याचं घोषित केलं. जेमिमा मैदानातून बाहेर पडली आणि ट्वीस्ट आला. तिसऱ्या पंचांनी नो असल्याचं सांगितलं आणि तिला फ्री हिट मिळाला. दुसऱ्या चेंडूवर तिने चौकार मारला.
भारताला हरमनप्रीत कौरच्या रुपाने तिसरा तिसरा धक्का बसला आहे. संघाच्या 106 धावा असताना हरमनप्रीत कौर 19 धावा करून तंबूत परतली. तिच्या विकेटमुळे टीम इंडियाला धक्का बसला आहे.
भारताने 22 षटकात 2 गडी गमवून 100 धावा केल्या आहे. हरमनप्रीत कौर 1, तर हरलीन 30 धावांवर खेळत आहेत. भारताला पहिला धक्का 48, तर दुसरा धक्का 67 धावांवर बसला होता.
स्मृती मंधानानंतर प्रतिका राऊल 31 धावा करून तंबूत परतली आहे. तिलाही या सामन्यात फार काही खास करता आलं नाही. सादिका इकबालच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाली.
भारताला स्मृती मंधानाच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. स्मृती मंधाना 32 चेंडूत 23 धावा करून बाद झाली आहे. फातिमा सनाच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतली. तिने रिव्ह्यू घेतला पण त्यात स्पष्ट बाद असल्याचं दिसून आलं. त्यामुळे भारताचा एक रिव्ह्यू वाया गेला.
भारतीय संघाने पॉवर प्लेच्या सात षटकात सावध फलंदाजी केली आहे. प्रतिका राऊल आणि स्मृती मंधानाने नाबाद 36 धावांची भागीदारी केली.
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. या जोडीने 5 ओव्हरमध्ये 33 रन्स जोडल्या आहेत. स्मृती 11 आणि प्रतिका 21 धावांवर नाबाद खेळत आहेत. या जोडीने ही भागीदारी अशीच वाढवावी, अशी आशा चाहत्यांना आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारताकडून स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड आणि श्री चरणी.
वूमन्स पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (विकेटकीपर), फातिमा सना (कॅप्टन), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू आणि सादिया इक्बाल.
पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. कॅप्टन फातिमा सना हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टॉसदरम्यान टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने फातिमा सनासह हस्तांदोलन टाळलं.
पाकिस्तान संभाव्य प्लेइंग 11 : अलीबा, अलिमा, अलिमा, अलिमा रियाझ, सिद्रा नवाज (विकेटकीपर), नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), रमीन शमीम, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड आणि श्री चरणी.
“आमचे मुख्य ध्येय खेळणे आहे. जेव्हा आम्ही येथे येतो तेव्हा आमचे लक्ष फक्त खेळावर असते,” असे पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना सामन्यापूर्वी म्हणाली.
भारत आणि पाकिस्तान महिला संघात आतापर्यत 11 सामने झाले आहेत. भारताने 11 सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. आजचा सामना जिंकून 12-0 करण्याचा मानस असणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते. तसेच पाकिस्तानी मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला होता.आता भारतीय महिला संघही असाच बाणा ठेवेल का? आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणं टाळेल का? याकडे लक्ष असेल.
स्मृती मंधाना या वर्षी उत्तम फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 12 वे वनडे शतक झळकावले होते. या वर्षात तिने तिसरे शतक ठोकलं होतं. एका वर्षात दोनदा तीन शतके झळकावणारी जगातील पहिली खेळाडू ठरली. आता चौथं शतक झळकावणार का? याकडे लक्ष लागून आहे
“भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान वातावरण आक्रमक असतं. मैदान नेहमीच भरलेले असते. सकाळपासून भेटणारे प्रत्येकजण जिंकण्यासाठी सांगतो. अशा प्रकारचे वातावरण कधीकधी तुमच्यातील सर्वोत्तम गुण बाहेर काढते. माझे सहकारी आणि मी ते खूप पसंत करतो,” असं हरमनप्रीत कौर म्हणाली
कोलंबोची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्कृष्ट असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला. प्राधान्य दिलं जाईल. धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल, असं क्रीडातज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलंबोमध्ये 4 ऑक्टोबरला पडलेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलिया श्रीलंका सामना रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण वाटून दिला. याच ठिकाणी भारत पाकिस्तान सामना होत आहे. आजची परिस्थिती कालसारखी नाही. अॅक्यूवेदरच्या मते, पावसामुळे टॉस उशिरा होण्याची शक्यता आहे. उर्वरित सामन्यात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा लक्ष्यांचा पाठलाग करताना पावसाचा दुसरा सरी येण्याची शक्यता आहे.
भारत पाकिस्तान हे चौथ्यांदा भिडणार आहे. मागच्या 30 दिवसातील हा चौथा सामना आहे. यापूर्वी पुरुष भारतीय संघ आशिाया कप स्पर्धेत तीनदा भिडले होते.
भारत पाकिस्तान वुमन्स क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेतील दुसरा सामना आहे. हा सामन्याचं JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपण असेल. तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर हा सामना उपलब्ध असेल.
पाकिस्तानला स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता स्पर्धेत राहण्यासाठी दुसरा सामना जिंकणं भाग आहे. अन्यथा उपांत्य फेरीची शक्यता प्रत्येक पराभवानंतर कठीण होत जाईल.
भारतीय संघाने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 59 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर आता भारताकडे पाकिस्तानला पराभूत करून गुणतालिकेत टॉपला येण्याची संधी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
वूमन्स पाकिस्तान टीम : सिद्रा नवाज (विकेटकीपर), फातिमा सना (कॅप्टन), मुनीबा अली, ओमैमा सोहेल, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल, शवाल झुल्फिकार, एमान फातिमा, सय्यदा आरूब शाह आणि सदफ शमास.
वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि उमा चेत्री.
आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आज 5 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान 2 संघ भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. तर पाकिस्तानसमोर सलग दुसरा पराभव टाळुन भारतासमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान आहे.