AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Scotland Toss result: नाणेफेकीचा दुष्काळ सरला, भारताने टॉस जिंकत निवडली गोलंदाजी

टी20 विश्वचषकातील पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर तिसरा सामना जिंकून भारताने स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले आहे. पण आजचा सामनाही भारतासाठी करो या मरो असाच आहे.

India vs Scotland Toss result: नाणेफेकीचा दुष्काळ सरला, भारताने टॉस जिंकत निवडली गोलंदाजी
भारत विरुद्ध स्कॉटलंड
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 7:14 PM
Share

T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकातील भारताचा चौथा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. भारत आणि स्कॉटलंड या सामन्याला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरुवात होत आहे. सामन्यापूर्वी भारतासाठी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. ती म्हणजे विश्वचषकाच्या एकाही सामन्यात भारताला नाणेफेक जिंकता आली नव्हती, पण आज विराटला नशिबाने साथ दिल्यामुळे नाणेफेक भारताने जिंकली आहे. इतर संघाप्रमाणे धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने पुढील फेरीच्या भारताच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. पण अजूनही आशा शिल्लक असल्याने भारतीय संघ विजयासाठी सर्व प्रयत्न करत आहे. त्यान्वयेच आजच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने नमवल्यास भारताला गुणतालिकेत फायदा होऊ शकतो. तर भारत पराभूत झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे आजचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.

स्कॉटलंड संघ: जियॉर्ज मुन्से, कायल कोटजेर, मॅथ्यू क्रॉस, रिची बरीग्टंन, कॅलम मॅकलियॉड, मायकल लिस्क, ख्रिस ग्रेव्ह्स, मार्क वॅट, सॅफयन शरीफ, अलासदीर इवान्स, ब्रॅडली व्हिल.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपनंतर 18 वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणार, ICC च्या 3 ट्रॉफी जिंकणाऱ्या चॅम्पियन्सची मोठी घोषणा

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

(India vs Scotland Toss result: In india vs Scotland match India won the toss and elected to field first)

Follow Us
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा