IND vs SA: विराट कोहली पत्रकार परिषदांपासून पळतोय? राहुल द्रविड यांनी दिली उत्तर

IND vs SA: विराट कोहली पत्रकार परिषदांपासून पळतोय? राहुल द्रविड यांनी दिली उत्तर
Rahul Dravid - Virat Kohli

टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी विराटच्या अनुपस्थितीवरुन त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 02, 2022 | 4:56 PM

जोहान्सबर्ग: कसोटी कर्णधार विराट कोहलीवरुन (Virat kohli) सध्या बाहेर बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. दोनच दिवसापूर्वी निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (chetan sharma) यांनी कर्णधारपदाच्या मुद्यावर भाष्य करुन वाद उकरुन काढला. त्याशिवाय कोहलीचा फॉर्मही सध्या चांगला नाही. भारतीय संघ सेंच्युरियनमध्ये कसोटी सामना जिंकला असला, तरी विराट कोहलीला मागच्या दोन वर्षात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सेंच्युरियन कसोटीच्या दोन्ही डावात संघाला गरज असताना, तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावर बरीच टीका-टिप्पणी सुरु आहे. (India vs South Africa Is virat kohli avoiding press conferences Head coach Rahul Dravid answers)

विराट नाही राहुल द्रविड पत्रकारांना सामोरे गेले

उद्यापासून जोहान्सबर्गमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु होतोय. आज कसोटीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद झाली. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी विराटच्या अनुपस्थितीवरुन त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. क्रिकेटमध्ये कसोटीच्या पूर्वसंध्येला कर्णधार पत्रकार परिषदेला संबोधित करतो. मागच्या महिन्यात सेंच्युरियन कसोटीच्याआधी विराट कोहली पत्रकार परिषदेला सामोरा गेला नाही. उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटीआधीही विराटने पत्रकार परिषद घेतली नाही. या दोन्ही पत्रकार परिषदा राहुल द्रविड यांनी घेतल्या. त्यामुळे सहाजिकच त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

विराट का पळतोय?

विराट कोहलीच्या वक्तव्यावरुन सध्या जे वाद सुरु आहेत, त्यामुळे विराट कोहली पत्रकार परिषदा टाळतोय? असा प्रश्न राहुल द्रविड यांना विचारण्यात आला. त्यावर द्रविड यांनी “असं काही नाहीय. मीच विराटला थांबवलय. केप टाऊनमध्ये तो 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. त्याने त्या पत्रकार परिषदेला संबोधित केले, तर ती मोठी गोष्ट ठरेल. पत्रकार त्याला 100 व्या कसोटीबद्दल प्रश्न विचारु शकतात. मला जितकं माहितीय त्यानुसार, विराट इथे नाहीय, त्यामागे दुसर कुठलही अन्य कारण नाहीय”

“विराट बोलतोय, कसोटी सामन्याच्यावेळी टॉस आणि इतरवेळी तो बोलत असतो. 100 व्या कसोटीआधी तो मीडियाशी बोलेल” असे राहुल द्रविड यांनी सांगितले. “विराट शानदार काम करतोय. मागच्या 20 दिवसांपासून तो खूप चांगल्या पद्धतीने संघाच्या संपर्कात आहे. स्वत:च्या तयारीसह शानदार कर्णधार म्हणून तो समोर आलाय. टीममध्ये चांगले वातावरण आहे, यात विराटची महत्त्वाची भूमिका आहे” असे राहुल द्रविड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या: 

South Africa vs India 2nd Test: उद्या पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे जोहान्सबर्गचा वेदर रिपोर्ट
Sulli Deal | मुस्लीम महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, ‘सुल्ली डील’ नेमका प्रकार काय ?
Nawab Malik : नवाब मलिकांचा एनसीबीवर पुन्हा गंभीर आरोप, अधिकारी आणि पंचांमधील कथित ऑडिओ क्लिपही जाहीर

(India vs South Africa Is virat kohli avoiding press conferences Head coach Rahul Dravid answers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें