Shardul Thakur: कॅप्टन कोहली दुसऱ्या टेस्टमध्ये पालघरच्या शार्दुल ठाकूरला वगळणार?

आता न्यू वाँडर्सवर संघनिवडीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. खासकरुन गोलंदाजीमध्ये चेंजेस होऊ शकतात. पालघरच्या शार्दुल ठाकूरऐवजी विदर्भाच्या उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते.

Shardul Thakur: कॅप्टन कोहली दुसऱ्या टेस्टमध्ये पालघरच्या शार्दुल ठाकूरला वगळणार?
shardul thakur espn crikinfo
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 2:53 PM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनमधून विजयी अभियानाला सुरुवात करणारी टीम इंडिया उद्या जोहान्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर (New Wanderers Stadium)मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. न्यू वाँडर्स स्टेडियमचा इतिहास भारताच्या बाजूने आहे. 2006 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेतला पहिला कसोटी विजय याच मैदानावर मिळवला होता. 2018 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताच्या परदेशातील विजयी अभियानाला याच वाँडर्स स्टेडियमवरुन सुरुवात झाली होती. सेंच्युरियनमध्ये भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली होती. (India vs South Africa Johannesburg New Wanderers Stadium Will Virat kohli give chance to umersh yadav instead of Shardul Thakur)

गवतामुळे उमेश यादवला संधी ? आता न्यू वाँडर्सवर संघनिवडीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. खासकरुन गोलंदाजीमध्ये चेंजेस होऊ शकतात. पालघरच्या शार्दुल ठाकूरऐवजी विदर्भाच्या उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते. त्याचे कारण आहे न्यू वाँडर्सची खेळपट्टी. न्यू वाँडर्सच्या खेळपट्टीवर गवत असून हा पीच सीम आणि स्विंग गोलंदाजांना अनुकूल ठरु शकतो. “फुल लेंथ गोलंदाजी करणाऱ्या उमेश यादवकडे चांगला पेसही आहे. ज्या लेंथने आणि वेगाने उमेश यादव गोलंदाजी करतो, तशा प्रकारच्या गोलंदाजीला वाँडर्सची खेळपट्टी साथ देऊ शकते. त्यामुळे तो या सामन्यात खेळला नाही, तर मला आश्चर्याचा धक्का बसू शकतो” असे दक्षिण आफ्रिकन संघाचे माजी व्हिडिओ विश्लेषक प्रसन्ना अगोराम म्हणाले.

विराटचे अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य भारताने आतापर्यंत नेहमीच विजयी संघ कायम ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. कर्णधार विराट कोहली नेहमी अष्टपैलू खेळाडूला प्राधान्य देतो. कारण त्यामुळे एक पर्याय उपलब्ध होतो. उमेश यादवच्या तुलनेत शार्दुल ठाकूर उपयुक्त फलंदाजी सुद्धा करु शकतो. याचा कारणामुळे सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत इशांत शर्माऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती.

पहिल्या कसोटीत शार्दुल निष्प्रभ आतापर्यंत शार्दुलने प्रत्येकवेळी विराटचा विश्वास सार्थ ठरवला आहे. सेंच्युरियन कसोटीत शार्दुल गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात विशेष चमक दाखवू शकला नव्हता. पहिल्या डावात त्याला फक्त दोन विकेट मिळाल्या होत्या तर फलंदाजीमध्ये दोन्ही डावात मिळून त्याने 14 धावा केल्या होत्या. त्यामुळे उद्या विराट शार्दुलला निवडणार की, उमेशला संधी देणार, त्याची उत्सुक्ता आहे.

संबंधित बातम्या:

मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षाचे गिफ्ट, नांदेड ते हडपसर रेल्वेला सुरुवात, प्रवासी भाड्यात बक्कळ कपात! Ajit Pawar | दादांना विचारलं कोरोनाची लाट रोखण्यासाठी काय तयारी ? अजित पवार यांनी पाढाच वाचला, म्हणाले… पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

(India vs South Africa Johannesburg New Wanderers Stadium Will Virat kohli give chance to umersh yadav instead of Shardul Thakur)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.