मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षाचे गिफ्ट, नांदेड ते हडपसर रेल्वेला सुरुवात, प्रवासी भाड्यात बक्कळ कपात!

मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षाचे गिफ्ट, नांदेड ते हडपसर रेल्वेला सुरुवात, प्रवासी भाड्यात बक्कळ कपात!

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी पुण्याला जाण्याकरिता आज नव्या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेचा जालन्यातून शुभारंभ करण्यात आला.

दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 02, 2022 | 2:24 PM

जालनाः मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकरिता आज आणखी एका रेल्वेसेवेला सुरुवात झाली. नवीन वर्षात नांदेड ते हडपसर या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यात या रेल्वेचा शुभारंभ केला. त्यामुळे एरवी पुण्याला जाण्यासाठी बस किंवा ट्रॅव्हल्सने 500 ते 800 रुपये भरावे लागतात. सामान्यपणे सीटिंगच्या जागेवर प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचे तिकिट अत्यंत स्वस्त आकारण्यात येत आहे.   द्वितीय श्रेणीतील तिकिटासाठी 185 रुपये भरावे लागतील. तर स्लीपर कोचसाठी 315 रुपये दर आकरले जातील.  त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना ही रेल्वे सोयीस्कर ठरणार आहे.

दानवेंच्या हस्ते शुभारंभ

जालना येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या रेल्वेचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, नांदेड, जालना,परभणी, औरंगाबाद वरून पुण्याला जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. सध्या प्रवाशी पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हलने प्रवास करतात. सध्या जालनेकर पुण्याला जाण्यासाठी 500 ते 800 पर्यंत भाडे मोजतात. आता मात्र जालन्यातून पुण्याला जाण्यासाठी कमी पैशात प्रवास करता येणार आहे.

अत्याधुनिक डबे, सुपरफास्ट एक्सप्रेस

Raosaheb Danve in Train

जालना-हडपसर ट्रेनमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना मंत्री रावसाहेब दानवे

पुणे-नांदेड- पुणे ही गाडी यापूर्वी परळीमार्गे सुरु होती. कोरोनाकाळात ती बंद करण्यात आली. नव्याने सुरु करण्यात आल्यानंतर तिला थेट मराठवाडा मार्गावरून चालवण्यात येत आहे. या मार्गावरील मनमाड येथून ही गाडी पुण्याकडे वळणार आहे. तसेच रेल्वेगाडीच्या डब्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. सचखंड एक्सप्रेससासरखे एलएचबी डबे या विशेष गाडीला जोडण्यात आले आहेत. यामुले डिस्कब्रेक, सस्पेन्शन आदी बाबी तसेच अद्ययावत सुविधायुक्त हे डबे जोडले गेल्याने गाडीला गती मिळणार आहे. याच सुपरफास्ट एक्सप्रेसला रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

रेल्वेची वेळ काय?

पुण्यासाठीची रेल्वे-
नांदेडवरून रात्री 8.30 वाजता, रात्री 11.30 वाजता जालना आणि पुण्यात पहाटे पोहोचेल. जालनेकरांसाठी हा 652 किमीचा प्रवास असेल.
नांदेडला जाण्यासाठीची रेल्वे-पुण्यावरून रात्री 11.30 वाजता निघणार, सकाळी 8.35 वाजता जालन्यात आणि पुढे 1130 वाजता नांदेडमध्ये ही रेल्वे पोहोचेल.

नांदेड ते हडपसर तिकिटाचे दर कसे?

नांदेड ते हडपसर येथे जाण्यासाठी फर्स्ट एसी- 1905रुपये , सकेंड एसी 1995 रुपये, थर्ड एसी- 810 रुपये , स्लीपर कोच 315 रुपये, द्वितीय सीटिंग 135 रुपये, थर्ड इकोनॉमी- 750 रुपये असे दर आकारण्यात येतील.

इतर बातम्या-

Sangli Polictics: सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डायरीवरून नवा वाद, गोपीचंद पडळकर नाराज का?

Beed Election: बीड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें