
दक्षिण आफ्रिेकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 232 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या जोडीने केलेल्या चाबूक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 231 धावा केल्या. भारतासाठी तिलकने सर्वाधिक 73 तर हार्दिकने 63 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. त्यामुळे टीम इंडियाला 231 धावांपर्यंत पोहचता आलं. आता भारतीय गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार फटकेबाजी करुन टीम इंडियाला 200 पार पोहचवलं आहे. तिलक वर्मा याच्यानंतर हार्दिक पंड्या याने अर्धशतक झळकावलं आहे. भारताने यासह 200 पार मजल मारली आहे.
टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं आहे. तिलकने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.
हार्दिक पंड्या याने जॉर्ज लिंडे याच्या बॉलिगवर दे दणादण फटकेबाजी केली आहे. टीम इंडियाने 14 व्या ओव्हरमध्ये 27 धावा मिळवल्या आहेत. टीम इंडियाने या ओव्हरमध्ये 3 सिक्स, 2 फोर आणि 1 सिंगलसह या 27 धावा मिळवल्या.
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याची निराशाजनक कामगिरी कायम आहे. सूर्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यातही अपयशी ठरला. सूर्या 5 धावा करुन आऊट झाला.
जॉर्ज लिंडे याने टीम इंडियाचा सेट बॅट्समन संजू सॅमसन याला आऊट केलं आहे. टीम इंडियाने यासह दुसरी विकेट गमावली आहे. क्विंटन डी कॉक याने जॉर्ज लिंडे याच्या बॉलिंगवर संजूला स्टंपिंग केलं. संजूने 22 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.
कॉर्बिन बॉश याने टीम इंडियाची सेट जोडी फोडली आहे. बॉशने अभिषेक शर्मा याला विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं. संजू आणि अभिषेक या जोडीने 63 धावांची सलामी भागीदारी केली. तर अभिषेकने 21 बॉलमध्ये 34 रन्स केल्या आणि आऊट झाला.
टीम इंडियाच्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या 4 ओव्हरमध्ये बिनबाद 41 धावा केल्या आहेत. संजू 22 तर अभिषेक 19 धावांवर नाबाद खेळत आहेत.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्रक्रम (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी आणि ओटनील बार्टमन.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अंतिम टी 2oi सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन एडन मार्रक्रम याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने आम्हाला बॅटिंगच हवी होती असं म्हटलं. त्यामुळे आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
एडन मार्रक्रम (कॅप्टन), ओटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हीस, क्विंटन डी कॉक, डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, लुथो सिपामला, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, ट्रिस्टन स्टब्स आणि केशव महाराज.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंगटन सुंदर.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा आणि अंतिम टी 20I सामना होणार आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही मालिका जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुण तरुणींचा धिंगाणा पाहायला मिळाला. याचा व्हीडीआे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांसमोरही देखील मद्यधुंद तरुणी शिव्या देत होती. भर रस्त्यात तरुण तरुणींच्या धिंगाण्यामुळे पाेलिस ठोस कारवाई का करीत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेना मंत्री संजय शिरसाठ यांच्यात युती संदर्भात बैठक. दुपारी 3 वाजता पार पडणार बैठक. अतुल सावे 50 टक्के वर ठाम तर शिवसेनेला काय मिळणार याकडे लक्ष. जागावाटपा संदर्भात अद्याप ठोस निर्णय झालेला नसून बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या परिसरात मध्यरात्री जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. रोहिदास कोळी असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग दोन राउंड फायर झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
छत्रपती संभाजी नगरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असून तुफान गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे स्वतः मंत्री अतुल सावे हे सर्वच इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्नांच्या संदर्भात विचारणा करताना पाहायला मिळत आहे. वॉर्डातील समीकरण मतदानाची परिस्थिती आणि वार्डात काय गोष्टी केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी अतुल सावे इच्छुक उमेदवारांना विचारत आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20i सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हा पाचवा सामना मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र या मालिकेचा काय निकाल लागणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला पराभूत करुन मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. अशात या सामन्यात कोण मैदान मारणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.