IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर, राहुलकडे नेतृत्व

जोहान्सबर्ग कसोटीत भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी लोकेश राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर, राहुलकडे नेतृत्व
Virat Kohli
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 2:03 PM

जोहान्सबर्ग : जोहान्सबर्ग कसोटीत भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी लोकेश राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी केएल राहुलने सांगितले की, विराट कोहलीने पाठीच्या दुखण्यामुळे या सामन्यातून माघार घेतली आहे. मात्र, केपटाऊनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत कोहली खेळण्याची शक्यता आहे. (India vs South Africa : Virat Kohli out of Johannesburg test due to back injury, KL Rahul leads India in 2nd Test)

विराट कोहलीला जोहान्सबर्ग कसोटीतून वगळण्याचा अर्थ असा आहे की, तो यापुढे दक्षिण आफ्रिकेत त्याची 100 वी कसोटी खेळू शकणार नाही. कोहलीने आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. अशा स्थितीत तो जोहान्सबर्गमध्ये 99 वी कसोटी आणि नंतर केपटाऊनमध्ये 100 वी कसोटी खेळणार होता. पण, दुखापतीमुळे भारतीय चाहत्यांना त्याला शंभराव्या कसोटीत खेळताना पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विराट कोहली आता बंगळुरूमध्ये 100 वी कसोटी खेळू शकतो. जोहान्सबर्ग कसोटीत हनुमा विहारीने विराट कोहलीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.

विराट कोहली न खेळल्याने किती नुकसान?

विराट कोहलीचं दुसऱ्या कसोटीत न खेळणं टीम इंडियासाठी मोठ्या नुकसानापेक्षा कमी नाही. जोहान्सबर्गमधील त्याची आकडेवारी खूप चांगली आहे. विराट कोहली हा वाँडरर्सच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे, तसेच या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो जॉन रीडनंतर दुसरा परदेशी फलंदाज आहे. जोहान्सबर्गमध्ये विराट कोहलीने 310 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर जॉन रीडच्या नावावर 316 धावा आहेत. आजच्या सामन्यात न खेळल्यामुळे रीडचा विक्रम मोडण्याची संधी विराटच्या हातून निसटली आहे.

विराटच्या शतकाची प्रतीक्षा लांबली

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018 च्या दौऱ्यावर भारताने जोहान्सबर्ग येथे खेळलेला कसोटी सामना जिंकला होता. यावेळी त्याला वाँडरर्सवर दुसरा विजय नोंदवून कसोटी मालिका जिंकणारा कर्णधार बनण्याची संधी होती. मात्र दुखापतीमुळे त्याला यापासून वंचित राहावे लागले आहे. विराट कोहलीचा वाँडरर्समधील उत्कृष्ट विक्रम पाहता, त्याच्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना केप टाऊन कसोटीची वाट पाहावी लागणार आहे.

इतर बातम्या

IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये शतकांचा दुष्काळ संपणार? नव्या वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी विराट कोहली सज्ज

IND vs SA : जोहान्सबर्गमधून क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! दुसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट

‘मी नीट लक्ष देऊन ऐकलं, तो रडण्याचा आवाज माझ्या बायकोचा होता’, अश्विनने सांगितला ऑस्ट्रेलियातला किस्सा

(India vs South Africa : Virat Kohli out of Johannesburg test due to back injury, KL Rahul leads India in 2nd Test)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.