AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: पहिल्या T20 मध्ये हार्दिक पंड्या ह्दयावर दगड ठेवून ‘या’ खेळाडूला ठेवणार Playing 11 बाहेर

IND vs SL: हार्दिक पंड्यासमोर दुसरा पर्याय नाहीय, त्यामुळे त्याला हा कठोर निर्णय घ्यावा लागेल, कोण आहे तो प्लेयर?

IND vs SL: पहिल्या T20 मध्ये हार्दिक पंड्या ह्दयावर दगड ठेवून 'या' खेळाडूला ठेवणार Playing 11 बाहेर
Hardik-pandya Image Credit source: PTI
| Updated on: Jan 02, 2023 | 6:50 PM
Share

मुंबई: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये मंगळवारपासून 3 टी 20 सामन्याची सीरीज सुरु होत आहे. पहिला टी 20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. टी 20 सीरीजचे उर्वरित दोन सामने 5 जानेवारी पुणे आणि 7 जानेवारीला राजकोट येथे होतील. हार्दिक पंड्यासाठी ही सीरीज महत्त्वपूर्ण आहे. या सीजनमध्ये दुसऱ्यांदा तो रोहित शर्माच्या जागी नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार यादवला या सीरीजसाठी प्रमोशन देण्यात आलय. त्याची उपकर्णधारपदी निवड झालीय.

पहिल्या टी 20 मध्येच हार्दिक घेणार मोठा निर्णय

निवड समितीने रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना या सीरीजसाठी विश्रांती दिलीय. सलामीसह अन्य जागांसाठी नव्या खेळाडूंची क्षमता तपासण्यात येईल. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज खेळणाऱ्या मोहम्मद सिराजला संधी दिलेली नाही. शिवम मावी आणि मुकेश कुमार या दोन युवा गोलंदाजांपैकी एकाला संधी मिळू शकते.

हार्दिक पंड्याकडून भरपूर अपेक्षा, कारण….

पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला आयपीएलच विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्यासाठी ही मोठी संधी आहे. पंड्याच्या नावाची टी 20 टीमचा कायमस्वरुपी कॅप्टन म्हणून घोषणा होऊ शकते. नोव्हेंबर 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकली. त्याआधी आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकली. त्यामुळे हार्दिकच वजन वाढलय. हार्दिकने आपले नेतृत्व गुण सिद्ध केलेत. वनडे टीमच्या उपकर्णधारपदी त्याची निवड झालीय. हार्दिक आघाडीवर राहून टीमच नेतृत्व करतो. स्वत:च्या प्रदर्शनातून तो टीमसमोर उदहारण ठेवतो. हार्दिक पंड्याकडे गरजेनुसार खेळ करण्याची समज आहे. त्यामुळे त्याच्याकडून टीम इंडियाच्या चाहत्यांना भरपूर अपेक्षा आहेत.

ह्दयावर दगड ठेवून ‘या’ खेळाडूला करणार Playing 11 बाहेर

टीम मॅनेजमेंटला पहिल्या सामन्याआधी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पंड्या आणि हेड कोच राहुल द्रविड यांना सलामीवीरांच्या जागेबद्दल निर्णय घ्यावा लागेल. इशान किशनने बांग्लादेश विरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये डबल सेंच्युरी ठोकली होती. दुसऱ्या स्थानासाठी ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलमध्ये स्पर्धा आहे. हार्दिक पहिल्या टी 20 मध्ये ऋतुराज गायकवाडसाठी शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हन बाहेर बसवू शकतो. ह्दयावर दगड ठेवून त्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे आणि टेस्ट दोन्हींमध्ये शतक ठोकून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलीय. गोलंदाजीत कोणाला संधी?

टीम मॅनेजमेंटला गोलंदाजांबद्दलही निर्णय घ्यावा लागेल. अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार यापैकी कोणाला संधी द्यायची? त्यावर निर्णय घ्यावा लागेल. स्पिन गोलंदाजांमध्ये वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलपैकी एकाला निवडावं लागेल. इशान किशन किंवा संजू सॅमसन यापैकी एक विकेटकीपिंगची जबाबदारी संभाळेल.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....