IND vs SL : भारत श्रीलंका सामन्यांवर कोरोनाचे संकट, कोरोनाच्या शिरकावामुळे भारतीय खेळाडू पुन्हा विलगीकरणात, सामन्याच्या वेळापत्रकात बदल

भारताचे युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. दोन्ही संघ मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज झाले असतानाच कोरोनाच्या शिरकावामुळे सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

IND vs SL : भारत श्रीलंका सामन्यांवर कोरोनाचे संकट, कोरोनाच्या शिरकावामुळे भारतीय खेळाडू पुन्हा विलगीकरणात, सामन्याच्या वेळापत्रकात बदल
भारतीय संघ

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार खेळाडूंना घेऊन कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्व संघाने श्रीलंकेत पोहचून आपला विलगीकरणाचा कालावधी संपवून सराव सामने खेळण्यास ही सुरुवात केली. श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार होता. पण कोरोनाच्या शिरकावामुळे आता श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. तसेच सर्व भारतीय संघाला पुन्हा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (India vs Sri Lanka Matches Scheduled Postponed by 4 days Players are in quarantined inside hotel)

श्रीलंका क्रिकेट संघाच्या चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेचील सहा सामने जे 13 जुलैपासून सुरु होणार होते, ते पुढे ढकलून 17 जुलैपासून सुरु करण्यात येऊ शकतात. श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला यावेळी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि जी. टी. निरोशान यांच्यासह दोघांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली. त्यामुळेच संपूर्ण श्रीलंका संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघालाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

असे असू शकते नवे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 17 जुलै
  • दुसरा एकदिवसीय सामना –  18 जुलै
  • तिसरा एकदिवसीय सामना – 20 जुलै
  • पहिला टी-20 सामना –  23 जुलै
  • दुसरा टी-20 सामना –  25 जुलै
  • तिसरा टी-20 सामना –  27 जुलै

हे ही वाचा :

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

(India vs Sri Lanka Matches Scheduled Postponed by 4 days Players are in quarantined inside hotel)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI