AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, कोण कोणावर भारी?, आकडे काय सांगतात?

IND vs SL: श्रीलंकन टीम T20 सीरीजमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक आहे, पण आकड्यांचा खेळ काय सांगतो? वनेडचा रेकॉर्ड पाहिल्यास कोणती टीम सरस आहे.

IND vs SL: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, कोण कोणावर भारी?, आकडे काय सांगतात?
ind vs sl
| Updated on: Jan 10, 2023 | 8:13 AM
Share

गुवाहाटी: T20 सीरीजनंतर टीम इंडिया आणि श्रीलंकमध्ये आजपासून वनडे सीरीज सुरु होत आहे. तीन सामन्यांच्या वनडे सीरीजला आजपासून गुवाहाटीमधून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने टी 20 सीरीज जिंकली. आता वनडे मालिका जिंकण्याचाही टीम इंडियाचा प्रयत्न असेल. वनडे टीममध्ये बदल दिसणार आहे. टी 20 मध्ये युवा खेळाडूंना संधी दिली होती. वनडे सीरीजमध्ये दिग्गज खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि केएल राहुल वनडे सीरीजमध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे टीम इंडिया आणखी बळकट झाली आहे.

टीम इंडियासमोर मोठं आव्हान

श्रीलंकन टीमने T20 सीरीजमध्ये टीम इंडियाला चांगली टक्कर दिली होती. आता दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन टीम वनडे सीरीजमध्ये सुद्धा टीम इंडियासमोर मोठं आव्हान निर्माण करु शकते. टीम इंडिया श्रीलंकेला कमजोर समजण्याची चूक करणार नाही. याय टीमने आशिया चषकाच जेतेपद पटकावलं होतं.

आकड्यांचा खेळ काय सांगतो?

या सीरीजआधी आतापर्यंत दोन्ही टीम्समध्य खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांवर नजर टाकली, तर आकडे यजमान भारताच्या बाजूने आहेत. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत एकूण 162 वनडे सामने झालेत. यात 93 सामने भारताने, तर श्रीलंकन टीमने 57 मॅचेसमध्ये विजय मिळवलाय. 11 सामन्यांचा कुठलाही निकाल लागला नाही. एक मॅच टाय झाली.

भारताची बाजू वरचढ

भारताने मायदेशात श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या वनडे सामन्यांबद्दल बोलायच झाल्यास, श्रीलंकेविरुद्ध 36 सामन्यात विजय मिळवलाय. श्रीलंकेने भारतात फक्त 12 सामने जिंकलेत. आकड्याच्या दृष्टीने भारताची बाजू पूर्णपणे वरचढ आहे. मागच्या 5 सामन्यात कोण कोणावर भारी?

भारत आणि श्रीलंकेमध्ये शेवटची वनडे सीरीज जुलै 2021 मध्ये झाली होती. श्रीलंकेत ही वनडे सीरीज झाली होती. त्यावेळी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. दोन्ही टीम्समधील मागच्या पाच सामन्यातील आकडे पाहिल्यास, भारताची बाजू वरचढ आहे. श्रीलंकेची टीम मागच्या पाच सामन्यात फक्त एक वनडे मॅच जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.