IND vs SA: वेस्ट इंडिजने भारत दौऱ्यासाठी केली संघाची घोषणा, अडीच वर्षानंतर या दिग्गजाचं पुनरागमन

IND vs SA: वेस्ट इंडिजने भारत दौऱ्यासाठी केली संघाची घोषणा, अडीच वर्षानंतर या दिग्गजाचं पुनरागमन

भारताविरुद्धच्या तीन वनडे (IND vs WI) सामन्यांसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. 6 ते 20 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 27, 2022 | 3:26 PM

गयाना: भारताविरुद्धच्या तीन वनडे (IND vs WI) सामन्यांसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. 6 ते 20 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिजचा संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला तीन वनडे सामने (Odi Series) होणार आहेत. हे तीन वनडे सामने आयसीसीच्या वनडे सुपर लीगचा भाग आहेत. पहिल्या टॉप सेव्हन संघांमध्ये येण्यासाठी वेस्ट इंडिजला पॉईंटस जिंकण्याची चांगली संधी आहे. मालिकेतील तीन टी-20 सामने कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर 16,18 आणि 20 फेब्रुवारीला खेळवले जाणार आहेत.

अनुभवी वेगवान गोलंदाज केमर रॉचचं अडीच वर्षानंतर संघात पुनरागमन झालं आहे. मधल्याफळीतील फलंदाज एनक्रुमाह बोनर आणि सलामीवीर ब्रँडन किंग यांची संघात निवड झाली आहे. रॉच वेस्ट इंडिजकडून आतापर्यंत 92 एकदिवसीय सामने खेळला असून त्याने 124 विकेट घेतल्या आहेत. बोनरने मागच्यावर्षी बांगलादेश विरुद्ध डेब्यु केला होता. तो तीन वनडे सामने खेळला आहे. ब्रँडन किंग आतापर्यंत चार सामने खेळला आहे.

“केमार रॉच आमचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. लवकर विकेट मिळवण्यासाठी आम्हाला अशा गोलंदाजाची गरज आहे. केमारचा इकोनॉमी रेट पाच आहे. संघ निवडीसाठी हे पुरेसं आहे” असं निवड समितीचे प्रमुख डेसमॉन्ड हेन्स यांनी सांगितलं.

वेस्टइंडीजचा संघ – कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऐलन, एनक्रुमाह बोनर, डेरेन ब्रावो, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शे होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, कीमार रोच, रोमारिया शेफरड, ओडियन स्मिथ आणि  हेल्डन वॉल्श जूनियर

india vs west indies kemar roach handed odi recall for indian tour in february

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें