AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा सूर्य चमकला, 7 षटकारांसह साकारली सर्वोच्च खेळी

भारतीय संघ अडचणीत असताना सूर्यकुमार फलंदाजीला आला. इशान किशन बाद झाल्यावर तो फलंदाजीला आला. इशान बाद झाल्यानंतर रोहित शर्माही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताची धावसंख्या 13.5 षटकांत 4 विकेट्सच्या बदल्यात 93 धावा अशी होती.

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा सूर्य चमकला, 7 षटकारांसह साकारली सर्वोच्च खेळी
Suryakumar Yadav (BCCI Photo)
| Updated on: Feb 20, 2022 | 10:29 PM
Share

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात आज शेवटचा तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता आहे. पण वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कायरन पोलार्डने (Kieron Pollard) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय विंडीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. तिसऱ्याच षटकात भारताने ऋतुराज गायकवाडची (4) विकेट गमावली. त्यानंतर 9.4 षटकात भारताची 3 बाद 66 अशी अवस्था झाली होती. मात्र पुढे सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरने भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 31 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्यात 7 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तर वेंकटेशने 19 चेंडूत 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 91 धावांची भागीदारी करत भारताला 184 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

संघाला अडचणीतून बाहेर काढलं

भारतीय संघ अडचणीत असताना सूर्यकुमार फलंदाजीला आला. इशान किशन बाद झाल्यावर तो फलंदाजीला आला. इशान बाद झाल्यानंतर रोहित शर्माही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताची धावसंख्या 13.5 षटकांत 4 विकेट्सच्या बदल्यात 93 धावा अशी होती. येथून सूर्यकुमारने अ‍ॅक्सिलेटरवर पाय ठेवत वेगाने धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. रोमारिया शेफर्डच्या चेंडूवर रोव्हमन पॉवेलने त्याचा झेल टिपला. सूर्यकुमारने शेवटच्या षटकातील पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याने आपल्या खेळीत सात षटकार आणि एक चौकार लगावला. 65 ही सूर्यकुमार यादवची त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीतली सर्वोच्च खेळी ठरली आहे.

व्यंकटेश अय्यरची साथ

या सामन्यात पुन्हा एकदा व्यंकटेश अय्यरने चांगली फलंदाजी करत सूर्यकुमारला साथ दिली. दोघांनी मिळून 37 चेंडूत 91 धावा केल्या. अय्यरने 19 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांमध्ये या जोडीने तुफानी धावा केल्या आणि एकूण 86 धावा जोडल्या. अय्यर आणि सूर्यकुमार या जोडीने पहिल्या सामन्यातही भारताला विजय मिळवून दिला होता. या जोडीने सामना फिनिश केला होता. त्या सामन्यात सूर्यकुमारने नाबाद 34 आणि व्यंकटेशने नाबाद 24 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. व्यंकटेशने दुसऱ्या सामन्यातही चांगली खेळी करत 33 धावा केल्या. तो सातत्याने खालच्या फळीत संघासाठी योगदान देत आहे.

पाच चेंडूत दोन डीआरएस

दरम्यान, 185 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विंडीजने विकेट गमावली आहे. या पहिल्या षटकातील सुरुवातीच्या 5 चेंडूत दोन वेळा डीआरएस (Decision Review System) पाहायला मिळाला. षटकातील तिसरा चेंडू काईल मेअर्सच्या पॅडवर जाऊन आदळला. पंचांनी बोट वर करुन मेअर्सला बाद घोषित केला. मात्र मेअर्सने डीआरएस घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंचांना निर्णय मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर पाचवा चेंडू काईल मेअर्सच्या बॅटला लागून यष्टीरक्षक इशान किशनच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. मात्र पंचांनी नकारार्थी मान डोलावली. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक आणि दीपक चाहर तिघांनाही विश्वास होता की, चेंडू बॅटला लागला आहे. त्यामुळे रोहितने क्षणाचाही विलंब न करता डीआरएस घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंचांना आपला निर्णय मागे घ्यायला लावत मेअर्सला बाद घोषित करण्यास सांगितले.

इतर बातम्या

IND vs WI : बडे दिलवाला! ऋतुराजसाठी हिटमॅन ‘वन-डाऊन’ येणार, आवेश खानचं पदार्पण

पैसे दिले नाहीत, जेम्स फॉकनरने पाकिस्तानची PSL लीग अर्ध्यावरच सोडली, हॉटेलमध्ये झुंबरवर बॅट, हेल्मेट फेकलं

Ranji Trophy सामन्यात 165 धावा, हनुमा विहारीने टीम इंडियासमोरील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.