झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय
भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने 219 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. यासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने पहिली टी20 मालिका जिंकली आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला. यासह तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण हा निर्णय भारतीय संघाच्या पथ्यावर पडला. भारतीय संघाने 20 षटकात 5 गडी गमवून 219 धावा केल्या आणि विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेचा संघ 17.5 षटकात 129 धावा करू शकला आणि भारताने हा सामना 91 धावांनी जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा हा पहिला टी20 मालिका विजय आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताने आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धची टी20 मालिका गमावली होती.
भारताचा डाव
भारताची या सामन्यात सुरूवात काही चांगली झाली नाही. सलामीला आलेला अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याचा डाव अवघ्या 8 धावांवर आटोपला. वैभव सूर्यवंशीने आक्रमक फटकेबाजी केली पण त्याला फक्त 20 धावा करता आल्या. त्यानंतर इशान किशनने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिसर्या विकेटसाठी या दोघांनी 42 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरचा डाव 25 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा मैदानात उतरला आणि त्याने इशानला साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इशान किशन 81 धावांवर असताना तंबूत परतला. रिंकु सिंहचा डाव 12 धावांवर आटोपला. पण तिलकने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याने 29 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. तर शिवम दुबेला तीन चेंडू खेळायला मिळाले आणि नाबाद 6 धावांवर राहिला.
भारताकडून विजयी धावा रोखण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने सात गोलंदाज मैदानात उतरवले. विशेष म्हणजे अभिषेक शर्माला देखील षटक दिलं. फलंदाजीत अपयशी ठरलेला अभिषेक शर्मा गोलंदाजीत मात्र यशस्वी ठरला. अभिषेक शर्माने 3 षटकात 17 धावा देऊन 3 विकेट काढले. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवण्याचं कारण मिळालं आहे.