AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: भारताकडून मालिकेत क्लीनस्वीप, वेस्ट इंडिजवर 3-0 ने दणदणीत विजय

अहमदाबाद: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 96 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजांमुळे विजय शक्य झाला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वेस्ट इंडिजला दबावाखाली ठेवलं. वेस्ट […]

IND vs WI: भारताकडून मालिकेत क्लीनस्वीप, वेस्ट इंडिजवर 3-0 ने दणदणीत विजय
| Updated on: Feb 11, 2022 | 8:51 PM
Share

अहमदाबाद: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 96 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजांमुळे विजय शक्य झाला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वेस्ट इंडिजला दबावाखाली ठेवलं. वेस्ट इंडिजकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. खालच्या फळीतील ओडियन स्मिथने (Odean smith) वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 18 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने जोरदार फटकेबाजी करताना तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. स्मिथची फटकेबाजी तशी काही उपयोगाची नव्हती, कारण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. वेस्ट इंडिजच्या सात विकेट गेल्या होत्या व लक्ष्य देखील खूप मोठे होते.

कर्णधार निकोलस पूरनने 34 धावा केल्या. त्याला कुलदीप यादवने स्लीपमध्ये रोहित शर्माकरवी झेलबाद केले. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून एकही फलंदाज आश्वासक फलंदाजी करु शकला नाही. भारताकडून दीपक चहर,  कुलदीप यादवने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट घेतल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक (80) धावा केल्या. संघाचा डाव अडचणीत असताना, ऋषभ पंत आणि अय्यरने चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. पंतनेही शानदार फलंदाजी करताना अर्धशतक (56) झळकवलं. दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा अडचणीत आला होता. पण वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहरने सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागादीर करुन डाव सावरला. सुंदरने (33) आणि चहरने (38) धावा केल्या.

आघाडीची फळी पुन्हा कोलमडली भारताची आघाडीची फळी आज पुन्हा एकदा कोलमडली. शिखर धवन (10), रोहित शर्मा (13) स्वस्तात बाद झाले. विराट कोहली तर भोपळाही फोडू शकला नाही. अवघ्या 42 धावात भारताचे तीन फलंदाज तंबूत परतल्यानंतर पंत-अय्यरने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी चांगल्या चेंडूला मान दिला तसेच खराब चेंडू सीमारेषेपारही धाडले. धावफलक हलता ठेवता वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार विकेट घेतल्या. अलझारी जोसेफ आणि हेडन वॉल्शने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

India won Against west indies in three match odi series captain rohit sharmas first series win

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली