AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Accident: ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Rishabh Pant Accident: ऋषभला कुठे मार लागलाय, त्याच्यावर कुठले डॉक्टर उपचार करतातय. कधी मेडिकल बुलेटिन येणार? त्याबद्दल डॉक्टरांनी सांगितल..

Rishabh Pant Accident: ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
| Updated on: Dec 30, 2022 | 11:50 AM
Share

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला आज सकाळी भीषण अपघात झाला. दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभ पंत शुक्रवारी दिल्लीवरुन रुडकीला चालला होता, त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्याच्या कारला अपघात झाला. ऋषभ पंत या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी काय सांगितलं?

ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. ऋषभवर डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. आताच काही सांगू शकत नाही. पण सध्यातरी चिंतेची बाब नाहीय. हाडांचे डॉक्टर आणि प्लास्टिक सर्जन ऋषभला झालेल्या दुखापतीची पाहणी करतायत. त्याच्या काही चाचण्या केल्या जातील. त्यानंतर काही वेळात मेडिकल बुलेटिन जारी करु. ऋषभ बेशुद्ध नाहीय. तो आमच्याशी बोलतोय. त्याला कुठे गंभीर दुखापत झालीय, असं वाटत नाही, अशी माहिती ऋषभवर उपचार करणारे डॉक्टर आशिष यांनी दिली.

ऋषभवर आधी रुडकीच्या सक्षम हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला डेहराडून येथील रुग्णालयात हलवलं. कसा झाला अपघात?

ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकली. पंतची कार या धडकेनंतर पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.