AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhana Khan Relationship : रिंकू सिंह सुहाना खानचा बॉयफ्रेंड? किंग खानच्या लेकीसोबत रिलेशनच्या बातमीने खळबळ

केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंह आणि मालक शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान यांच्या रिलेशनच्या बातमीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. खरंच दोघे रिलेशनमध्ये आहेत का नेमकं काय सत्य आहे जाणून घ्या.

Suhana Khan Relationship : रिंकू सिंह सुहाना खानचा बॉयफ्रेंड? किंग खानच्या लेकीसोबत रिलेशनच्या बातमीने खळबळ
| Updated on: May 27, 2024 | 4:55 PM
Share

आयपीएलधील 17 व्या पर्वामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा पराभव केला. केकेआर संघाने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केलंय. सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या यादीमध्ये आता केकेआर तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याच्याकडे केकेआरची मेंन्टॉरपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गंभीरने ही जबाबदारी लिलया पेलत संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. केकेआर टीम मॅनेजमेंटसाठी एक मोठा क्षण होता. अशातच एक बातमीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

केकेआरचा तगडा आणि बिग हिटर खेळाडू रिंकू सिंह आणि सुहान खान यांच्या रिलेशनच्या चर्चेने जोर धरला आहे. शाहरूख याची मुलगी सुहाना आणि रिंकू एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मागील वर्षाही दोघांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र रिंकू याने एक मुलाखतीदरम्यान आपण सिंगल असल्याचं सांगितल्यावर या चर्चांणा पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा रिंकू आणि सुहाना रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहेय. गेल्या वर्षी रिंकूने गुजरात टायटन्सविरूद्धचा सामना जिंकवला होता तेव्हा सुहानाच्या कमेंटनेही या चर्चेला खतपाणी मिळालं होतं.

केकेआरच्या रिंकूने गुजरातच्या यश दयाल याला पाच बॉलमध्ये पाच सिक्स मारत सामना जिंकवला होता. या मॅच विनिंग खेळीनंतर रिंकू केकेआरचा स्टार खेळाडू झाला. कमी पेशांमध्ये रिंकूला केकेआर फ्रँचायसीने खरेदी केलं होतं. मात्र रिंकू  फिल्डिंग आणि बॅटींग करत प्रदर्शन करोडोंमध्ये बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा दर्जेदार करत होता.

View this post on Instagram

A post shared by @thebindutimes

दरम्यान, केकेआर जिंकल्यावर सुहाना खान हिने शाहरूख खानला मिठी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या वडिलांना मिठी मारताना सुहाना भावूक झालेली दिसली. आता रिंकू आणि सुहाना दोघे रिलेशनमध्ये असल्याचं कितपत खरं आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.