AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 सुपरहिट गाणी असणारा Gen Z चा आवडता चित्रपट, गाणी इतकी सुपरहिट की, ऐकताच मन होते शांत

प्रत्येक Gen Z च्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळतात या चित्रपटातील 9 गाणी. सर्व गाणी ठरलेली सुपरहिट. आजही प्रत्येक गाणं ऐकल्याशिवाय प्रेक्षकांचं मन भरत नाही.

9 सुपरहिट गाणी असणारा Gen Z चा आवडता चित्रपट, गाणी इतकी सुपरहिट की, ऐकताच मन होते शांत
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 02, 2026 | 1:31 PM
Share

मिलेनियल्सनंतर सध्या Gen Z या पिढीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. साधारण 1997 ते 2012 या काळात जन्मलेल्या पिढीला Gen Z म्हटलं जातं. सोशल मीडिया, ट्रेंडिंग रील्स आणि नव्या संगीतासोबतच जुन्या गाण्यांनाही या पिढीकडून मोठी पसंती मिळताना दिसते. अशाच काही गाण्यांमुळे आजही Gen Z च्या आशिकांच्या प्लेलिस्टमध्ये खास स्थान टिकवून असलेला चित्रपट म्हणजे ‘आशिकी 2’.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ या म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केलं होतं. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 1990 मध्ये आलेल्या ‘आशिकी’पासून प्रेरित होता. तसेच ‘अ स्टार इज बॉर्न’ या कथेच्या रूपांतराशीही त्याचा संबंध होता. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई करत सुमारे 109 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

9 गाण्यांनी सजलेला ‘आशिकी 2’

‘आशिकी 2’ ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचं संगीत. चित्रपटातील एकूण 9 गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. जीत गांगुली यांनी चित्रपटातील बहुतांश संगीताची जबाबदारी सांभाळली तर मिथुन आणि अंकित तिवारी यांनीही काही गाणी संगीतबद्ध केली. इरशाद कामिल यांनी चित्रपटातील अनेक गाण्यांचे शब्द लिहिले.

या अल्बममध्ये ‘तुम ही हो’, ‘सुन रहा है ना तू’, ‘चाहूं मैं आना’, ‘हम मर जाएंगे’, ‘मेरी आशिकी’, ‘पिया आए ना’, ‘आसान नहीं यहां’, ‘भुला देना’ आणि ‘मिलने है मुझसे आई’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

या गाण्यांना अरिजित सिंह, श्रेया घोषाल, अंकित तिवारी, पलक मुच्छल, तुलसी कुमार, केके आणि मुस्तफा जाहिद यांसारख्या लोकप्रिय गायकांचा आवाज लाभला. विशेष म्हणजे ‘तुम ही हो’ आणि ‘चाहूं मैं आना’ यांसारखी गाणी आजही सोशल मीडिया आणि म्युझिक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ऐकली जातात.

‘आशिकी 2’ ठरला अरिजित सिंहच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट

‘आशिकी 2’ मधील गाण्यांनी अरिजित सिंह यांच्या कारकिर्दीला मोठी झेप मिळवून दिली. ‘तुम ही हो’ या गाण्याने त्यांना घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ‘चाहूं मैं आना’, ‘आसान नहीं यहां’ आणि ‘मिलने है मुझसे आई’ यांसारख्या गाण्यांमधूनही त्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद