न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची या आठवड्यात घोषणा! वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती?

T20 विश्वचषकात जे घडलं ते विसरून, चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील भारताची निवड समिती आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेसाठी (Home T20 Series against New Zealand) संघ निवडण्यासाठी बैठक घेणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची या आठवड्यात घोषणा! वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती?
Virat Kohli - Rohit Sharma

मुंबई : T20 विश्वचषकात जे घडलं ते विसरून, चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील भारताची निवड समिती आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेसाठी (Home T20 Series against New Zealand) संघ निवडण्यासाठी बैठक घेणार आहे. येत्या दोन दिवसांत न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत संघासोबतच टी-20 इंटरनॅशनलच्या नव्या कर्णधाराच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार आहे. खरंतर, विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे की, टी-20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये तो संघाचा कर्णधार राहणार नाही. (Indian selectors to meets in this week to pick squad for New Zealand home series, Seniors will be rested)

T20 विश्वचषक संपल्यानंतर 3 दिवसांनी न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मालिकेला सुरुवात होत आहे. 17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांची मालिका जयपूरमध्ये सुरू होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये खेळवला जाईल. तर तिसरा टी-20 सामना 21 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंडला भारत दौऱ्यावर 2 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. पहिली कसोटी 25 ते 29 नोव्हेंबर आणि दुसरी कसोटी 3 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

सीनियर खेळाडूंना विश्रांती

रोहित शर्मा हा भारताचा नव्या T20 कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार आहे. मात्र या टी-20 मालिकेतून काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. वरिष्ठांचे व्यस्त वेळापत्रक पाहता हे पाऊल उचलले जाऊ शकते. वास्तविक, भारताचे सर्व वरिष्ठ खेळाडू एप्रिलपासून सतत क्रिकेट खेळत आहेत. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्प्लिट कॅप्टन्सीबाबतही निवडकर्त्यांमध्ये चर्चा होऊ शकते. चेतन शर्मा आणि कुरुविला हे दोन भारतीय निवडकर्ते सध्या दुबईत आहेत. बाकी निवडकर्ते भारतात आहेत.

खेळाडूंना 10 नोव्हेंबरपर्यंत रिपोर्ट करावा लागेल

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंना 10 नोव्हेंबरपर्यंत रिपोर्ट करावा लागेल, त्यानंतर त्यांना 5 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये पाठवले जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी खेळाडूंकडे सरावासाठी पहिल्या सामन्यापूर्वी फक्त 2 दिवसांचा वेळ असेल. दरम्यान, भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीची सर्व औपचारिकताही पूर्ण झाली आहे. राहुल द्रविड हा मुख्य प्रशिक्षक असल्याचे मानले जात आहे. टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची मुलाखत क्रिकेट सल्लागार समितीसमोर होणार आहे.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: बटलरचं झंझावती शतक, इंग्लंडची विजयासह सेमी फायनलमध्ये एन्ट्री, श्रीलंका स्पर्धेबाहेर

T20 World Cup 2021: 5 प्रकारचे चेंडू फेकणाऱ्याला संघाबाहेर कसं केलं?, दिग्गज फिरकीपटूचा सवाल

लज्जास्पद! मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्स संतापले

(Indian selectors to meets in this week to pick squad for New Zealand home series, Seniors will be rested)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI