AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup : बाबर आझने याने कॅप्टनसी सोडावी का? कपिल देव यांच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये चर्चा

Kapil Dev On Babar Azam : वर्ल्ड कपमधून बाहेर झालेला पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

World Cup : बाबर आझने याने कॅप्टनसी सोडावी का? कपिल देव यांच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये चर्चा
| Updated on: Nov 14, 2023 | 11:33 AM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023मध्ये भारतासह, दक्षिण आफ्रिक, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ सेमी फायनलमध्ये गेले आहेत. चारही संघ आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांना भिडतील. यंदाच्या स्पर्धेमधून वर्ल्ड कप विनर इंग्लंड, पाकिस्तान या दोन तगड्या संघाना सेमी फायनलमध्ये जागा मिळवता आली नाही. पाकिस्तान संघाचा शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यावर टीका होत आहे. अशातच बाबरच्या समर्थनार्थ कपिल देव यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले कपिल यादव?

बाबर आझम याने मागील सहा महिन्यांमागे संघाला नंबर वन बनवलं होतं. पण जेव्हा एखादा खेळाडू झिरो होतो त्यावेळी लोकांची त्याच्याविषयीची मत जाणून घेतलीत तर ९९ टक्के लोकं त्याला संघातून ड्रॉप करतील. पण तेच जर एखादा सामान्य खेळाडू शानदार खेळी करून जाईल त्यावेळी सगळे त्यासा सुपरस्टार बोलतात. पण कधीच चालू कामगिरीवरून कोणत्याही खेळाडूचं मूल्यमापन केलं जावू शकत नाही. कारण त्याने आधी कशा प्रकाराची कामगिरी केलीय ती जाणून घेतली पाहिजे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.

तो खेळाडू कसा खेळतो, त्याच्यात किती जोश आणि टॅलेंट आहे हे पाहिलं पाहिजे. पहिल्या चेंडूवरही तुम्ही आऊट होऊ शकता. जगात असा कोणताही खेळाडू नाही जो पहिल्या चेंडूवर आऊट होऊ शकत नाही, असं कपिल देवने म्हटलं आहे. कपिल देवने बाबर आझमबाबत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९८३ साली पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देवने भारतासाठी 131 कसोटी सामने आणि 225 एकदिवसीय सामने खेळले असून यामधील कसोटीमध्ये 5248 धावा आणि वन डे मध्ये 3783 धावा केल्यात. त्यासोबतच कसोटीमध्ये 434 विकेट आणि वन डे मध्ये 253 विकेट घेतल्या आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.