INDW vs BANW : भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशमध्ये विजयी सलामी, 44 धावांनी उडवला धुव्वा

भारतीय महिला संघ पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बाजी मारली. बांगलादेशला 44 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

INDW vs BANW : भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशमध्ये विजयी सलामी, 44 धावांनी उडवला धुव्वा
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 7:12 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाने कंबर कसली आहे. यंदाचा टी20 वर्ल्डकप बांगलादेशमध्ये होणार आहे. यासाठी भारत बांगलादेश पाच सामन्यांची टी20 मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी पार पडला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमवून 145 धावा केल्या आणि विजयासाठी 146 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान गाठताना बांगलादेश संघांची दमछाक झाली. बांगलादेशने 20 षटकात 8 गडी गमवून 101 धावा केल्या. भारताने बांगलादेशला पहिल्या सामन्यात 44 धावांनी पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता भारतीय महिला संघ पुढच्या सामन्यातही आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

भारताची सुरुवात निराशाजनक झाली. संघाच्या 18 धावा असताना स्मृती मंधाना 9 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर शफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी डाव काही अंशी सावरला. शफाली वर्मा 31, तर यास्तिका भाटिया 36 धावा करून बाद झाली. सामन्यात भारतीय संघाकडून मोठी धावसंख्या कोणालाही उभारता आली नाही. हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 30 धावा, तर रिचा घोषने 17 चेंडूत 23 धावा केल्या. एस संजाना 11 आणि पूजा वस्त्राकार 4 धावा करून तंबूत परतले.

सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या रेणुका ठाकुर सिंह हीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. रेणुकाने 4 षटकात फक्त 18 धावा देत 3 गडी बाद केले. पूजा वस्त्रकारने 2, श्रेयंका पाटीलने 1, दीप्ती शर्माने 1 आणि राधा यादवने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, शोर्ना अक्टर, निगार सुलताना (विकेटकीपर/कर्णधार), फहिमा खातून, राबेया खान, शोभना मोस्तरी, नाहिदा अक्टर, सुलताना खातून, मारुफा अक्टर, फरिहा त्रिस्ना.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), एस सजना, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, राधा यादव.

Non Stop LIVE Update
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.