AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : हार्दीक पंड्याला संघात घेणं मोठी चूक, माजी पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताला दारुण पराभूत केलं. तेव्हापासून सर्वत्र याच सामन्याची चर्चा असून अनेक दिग्गज क्रिकेटपटूही आपआपली प्रतिक्रिया देत आहेत.

India vs Pakistan : हार्दीक पंड्याला संघात घेणं मोठी चूक, माजी पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया
हार्दीक पंड्या
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 7:37 PM
Share

T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना पार पडला. सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सनी पराभव केला. यावेळी पाकिस्तानने आधी उत्तम गोलंदाजी आणि नंतर क्लासिक फलंदाजी करत विजय मिळवला. दरम्यान सामना होऊन दोन दिवस उलटले तरी सर्वत्र या सामन्याची चर्चा सुरुच आहे. अनेकजण वेगवेगळे तर्क वितर्क नोंदवत असून पाकचा माजी दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक (Inzamam ul haq) यानेही त्याच मत माडलं आहे.

या सामन्यात हार्दिक पंड्याला संघात घेऊन विराटने मोठी चूक केली असल्याचं मत इंजमामने नोंदवलं आहे.  इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ‘हार्दिक पंड्याला संघात घेतल्याने भारताला मोठा तोटा झाला आहे. भारताने चूकीचा संघ निवडल्याने त्यांचा पराभव झाला. त्यामनी पंड्याच्या जागी सहावा गोलंदाज घेऊन मैदानात उतरले असते तर फायदा झाला असता.’

असा पार पडला सामना

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

इतर बातम्या

मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

(Inzamam ul haq questions virat kohli for selecting hardik pandya in team)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.