AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 Final : दोन विश्वचषक विजेते कर्णधार आमने-सामने, चेन्नई विजयी चौकार लगावणार की कोलकात्याकडे तिसरं जेतेपद

आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात दोन विश्वचषक विजेते कर्णधार आमने-सामने उभे ठाकले आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने 2011 साली विश्वचषक उंचावला होता. तर कोलकात्याचा कर्णधार ऑईन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने 2019 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

IPL 2021 Final : दोन विश्वचषक विजेते कर्णधार आमने-सामने, चेन्नई विजयी चौकार लगावणार की कोलकात्याकडे तिसरं जेतेपद
MS Dhoni vs Eoin Morgan
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई : बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग 2021 ची आज सांगता होणार आहे. आज स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) या दोघांमध्ये खेळवला जाणार आहे. या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघानी कसून तयारी केली असून नेमका विजेता कोण? या उत्तराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आयपीएल 2021 चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल. (Ipl 2021 csk vs kkr final match preview, MS Dhoni Chennai Super Kings and Eoin Morgan kolkata knight riders)

आजच्या सामन्यात दोन विश्वचषक विजेते कर्णधार आमने-सामने उभे ठाकले आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने 2011 साली विश्वचषक उंचावला होता. तर कोलकात्याचा कर्णधार ऑईन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने 2019 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 3 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे आजच्या विजयासह चेन्नई विजयाचा चौकार लगावण्याच्या तयारीत असणार आहे. तर कोलकात्यानेदेखील दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे तिसऱ्या चषकासाठी कोलकात्याने जोरदार तयारी सुरु केली आहे.

कोणता संघ ठरणार वरचढ?

दोन्ही संघाकडे अप्रतिम फॉर्ममधले खेळाडू आहे. पर्वाच्या सुरुवातीपासून चेन्नईने आपल्या नावाप्रमाणे दमदार खेळ दाखवला आहे. केकेआरचा संघ मात्र दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीला गुणतालिकेत अगदी खाली होता. पण मागील काही सामन्यात अगदी जादूई खेळ दाखवत केकेआर संघाने थेट अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली आहे. सध्या केकेआरचे फलंदाज खास फॉर्ममध्ये नसले तरी गोलंदाज मात्र धमाकेदार खेळ करत आहेत. दोन्ही संघासाठी आजच्या सामन्याचा विचार करता चेन्नईला केकेआरचं फिरकीपटूंचं त्रिकुट चक्रवर्ती, नारायण आणि शाकिब यांच्यापासून सर्वाधिक धोका आहे. तर केकेआरचा कर्णधार मॉर्गन आणि कार्तिक यांचा खराब फॉर्म हा सर्वात मोठा धोका आहे.

IPL 2021 Final साठी केकेआरची संभाव्य प्लेईंग 11 – व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, ऑईन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, लॉकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, शिवम मावी.

IPL 2021 Final साठी सीएसकेची संभाव्य प्लेईंग 11 – फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दीपक चाहर.

इतर बातम्या

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्याला सीएसकेचा दिग्गज खेळाडू मुकणार?, खराब फॉर्ममुळे संघ घेणार धक्कादायक निर्णय

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत

PHOTO: आगामी T20 World Cup साठी सर्व देश रंगणार नव्या रंगात, जर्सीचा लूक व्हायरल

(Ipl 2021 csk vs kkr final match preview, MS Dhoni Chennai Super Kings and Eoin Morgan kolkata knight riders)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.