AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षरश: अंगावर काटा, पण एकच कमतरता..; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना काय जाणवलं?

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. मात्र या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना एका गोष्टीची तीव्र कमतरता जाणवतेय.

अक्षरश: अंगावर काटा, पण एकच कमतरता..; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना काय जाणवलं?
Ranapati Shivray Swari Agra Image Credit source: Youtube
| Updated on: Jan 23, 2026 | 2:55 PM
Share

छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. याच ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.

औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहा, सर्वत्र कडेकोट पहारा आणि आजूबाजूला निराशेचा अंधार अशा मोठ्या बिकट अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट झाली होती. माणसांची उत्तम पारख असणारे, दूरदृष्टी आणि राजकीय जाण असणाऱ्या महाराजांनी या सगळ्या गोष्टी कशा हाताळल्या आणि ही स्वारी कशी यशस्वी केली याची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ येत्या 30 जानेवारीला प्रेक्षक भेटीला येणार आहे.

या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षरश: अंगावर काटा येतो, असं काहींनी म्हटलंय. तर काहींना यामध्ये फक्त एकाच गोष्टीची कमतरता जाणवली, ती म्हणजे चिन्मय मांडलेकर याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी जरी अभिजीत श्वेतचंद्रने कठोर मेहनत घेतली असली तर चिन्मयची जागा कोणीच घेऊ शकत नाही, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला. “शिवकाळातलं एक सुंदर आणि तेजस्वी पान उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला असून हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांची मेहनत लक्षात येईलच. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी नक्की होईल,” अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक अशा अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

मराठी चित्रपटाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत.‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासात दडलेले सुपरहिरोज AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. या ट्रेलर अनावरण प्रसंगी महाराजांचा ‘तिसरा डोळा’ अशी ख्याती असणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेच्या चॅटबॉटचं अनावरण करण्यात आलं. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या निमित्तानं झालेला हा प्रयत्न जो मराठी सिनेसृष्टीसोबतच शिवप्रेमी रसिकांसाठीसुद्धा अभिमानास्पद आहे. हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं विविध भाषेत अवघ्या काही सेकंदात देतं.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.