IPL 2021 : कोरोनावर मात करुन RCB चा महत्त्वाचा शिलेदार संघात परतला

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाला केवळ तीन दिवस शिल्लक आहेत, पण या लीगवरील कोरोनाचा धोका संपण्याचं नाव घेत नाही.

IPL 2021 : कोरोनावर मात करुन RCB चा महत्त्वाचा शिलेदार संघात परतला
Devdutt Padikkal
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 6:36 PM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाला केवळ तीन दिवस शिल्लक आहेत, पण या लीगवरील कोरोनाचा धोका संपण्याचं नाव घेत नाही. चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्सनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघालादेखील कोरोनाचा फटका बसला . आरसीबीचा स्टार युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे देवदत्तला उर्वरित संघापासून वेगळे करत आयसोलेट करण्यात आले होते. परंतु देवदत्तची नुकतीच एक कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो पुन्हा एकदा संघात परतला आहे. (IPL 2021: Devdutt Padikkal Joins RCB Team After Defeating Covid-19)

कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने देवदत्त चेन्नईमध्ये त्याच्या संघात सहभागी झाला आहे. त्याने आता सरावदेखील सुरु केला आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या चिंता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. ही बातमी आरसीबीसाठी महत्त्वाची आहे, कारण देवदत्त पडिक्कल आता मुंबईविरुद्धचा पहिला सामना खेळू शकेल, अशा आशा निर्माण झाल्या आहेत.

पडिक्कल बायो बबलमध्ये परतला

आयपीएलच्या मागील सीझनमध्ये आरसीबीसाठी सर्वाद जास्त धावा करणारा देवदत्त पडिक्कल बुधवारी चेन्नईमध्ये त्याच्या संघाच्या बायो बबलमध्ये परतला आहे. संघाने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार आरसीबीने म्हटलं आहे की, “बीसीसीआयच्या नियमांनुसार कोविड -19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डावखुरा फलंदाज देवदत्त पादक्कल 7 एप्रिल 2021 रोजी संघात सामील झाला आहे. याचा आम्हाला आनंद झाला. आरसीबीचं वैद्यकीय पथक खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेत आहे.

संघाचं बळ वाढलं

आरसीबीचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. पण देवदत्तचे या सामन्यात खेळणे कठीण झाले होते. आयपीएलच्या गेल्या हंगामात देवदत्त आरसीबीसाठी एक मोठा स्टार खेळाडू म्हणून समोर आला होता. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना त्याने चमकदार कामगिरी केली होती. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात देवदत्तचा मोठा वाटा होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याननंतर संघासमोर अडचण निर्माण झाली होती. परंतु आता तो संघात परतल्याने संघाचं बळ वाढलं आहे.

पडीक्कलची आयपीएलमधील कामगिरी

आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सर्वात जास्त धावा देवदत्तने फटकावल्या होत्या. त्याने या बाबतीत कर्णधार विराट कोहली आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सलादेखील मागे ठेवले होते. IPL 2020 मध्ये पडीक्कलला 15 सामन्यांमध्ये आरसीबी संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या 15 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 5 अर्धशतकांच्या तब्बल 473 धावा फटकावल्या होत्या.

देवदत्तची विजय हजारे करंडक स्पर्धेतील कामगिरी

देवदत्तने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉनंतर सर्वाधिक धावा चोपल्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने 4 शतकं सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता.

फॉरमॅट
सामने
डाव
नाबाद
धावा
हायस्कोर
सरासरी
BF
CT
SR
100s
50s
Firts Class
15
29
3
907
99
34.88
1794
6
50.55
0
10
List A
20
20
4
1387
152
86.68
1597
32
86.5
6
9
T-20
33
33
4
1271
122
43.82
871
50
145.92
1
11

संबंधित बातम्या

Devdutt Padikkal IPL 2021 RCB Team Player : IPL 2020 आणि विजय हजारे स्पर्धा गाजवणारा देवदत्त पडीक्कल पुन्हा धुमाकूळ घालणार?

175 चौकार आणि 46 षटकार, 2 फलंदाजांचा झंझावात, 1500 पेक्षा अधिक धावा, तरीही संघात स्थान नाही

(IPL 2021: Devdutt Padikkal Joins RCB Team After Defeating Covid-19)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.